दिपावली निमित्त साफसफाई कामगारांचा सत्कार

पुणे : व्हिजन सोशल फाउंडेशन व चतु:शृंगी परिसर कृती समिती ट्रस्ट यांच्या वतीने गोखलेनगर भागातील साफसफाई कामगरांचा सत्कार आमदार सिध्दार्थ शिरोळे यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व दिवाळी फराळ देऊन करण्यात आला.
ऊन , वारा , पाऊस यांची पर्वा न करता वर्षभर गोखलेनगर भागातील नागरिकांची आरोग्याची काळजी घेत परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम हे कामगार करत असतात. सार्वजनिक स्वच्छता ठेवणाऱ्या कामगारांचा सन्मान करण्याची संधी मिळाल्याबद्दल प्रतिष्ठानच्या वतीने कामगारांचे आभार मानण्यात आले.

यावेळी भाजपा पुणे शहर सरचिटणीस दत्ता खाडे, नगरसेविका राजश्री काळे, भाजपा पुणे शहर चिटणीस मंगल डेरे, भाजपा शिवाजीनगर अध्यक्ष रविंद्र साळेगावकर, सरचिटणीस गणेश बगाडे , शिवाजीनगर भाजपा चिटणीस जय जोशी , आरोग्य निरीक्षक तुषार राऊत, खडकी मंडल अध्यक्ष धर्मेश शहा, संजय फेंगसे, शशिकांत आंबेडे , गिरीश गावसकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन सतिश बहिरट , विकास डाबी , संतोष काळे , प्रसाद श्रीखंडे यांनी केले होते.




































