जग फिरल्यावर शेवटी आमच्या पुण्यातच लस सापडणार आहे. – सुप्रिया सुळेंचा नरेंद्र मोदींना टोला

पुणे : पुणेकरांनी बनविलेल्या कोरोनावरील लसीवर बाहेरून आलेल्यांनी क्लेम करू नये असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली. पुण्याच्या मावळमध्ये पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.
तुमच्या इथे 1400 कोटी, 1500 कोटींच्या गप्पा चालतात. आमच्या दिल्लीत तर एक लाख कोटींच्या गप्पा असतात. या गप्पा कोण मारतं तुम्हाला चांगलं माहीत आहेच. आज आहेत ‘ते’ आपल्या पुण्यात. बघा ‘दुनिया घुम लो, हमारे पुणे के आगे कुछ नहीं’. जग फिरल्यावर शेवटी आमच्या पुण्यातच लस सापडणार आहे. ही लस पुणेकरांनी शोधलीये, नाही तर कोणीतरी म्हणायचं मीच (स्वतःबाबत) शोधली. पुण्यामध्येच ही लस तयार झालेली आहे, पुणेकरांनी ती लस शोधलेली आहे, त्यामुळे बाहेरून येऊन लसीवर कोणी क्लेम केलं, तर गैरसमज नसावेत, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता टीका केली आहे.
शरद पवार साहेबांना ईडीची नोटीस आली आणि चित्र पालटलं. आता सेनेकडे ईडी आली. आधीच मुख्यमंत्री मिळालंय मग आता शिवसेनेला काही तरी मोठं चांगलं मिळणार आहे. ईडीचं पायगुण चांगलाच असतोय. येऊ द्या किती ही नोटिसा, सगळं चांगलंच घडेल. त्यानंतर दुसरी गोष्ट घडली म्हणजे पावसातील ती सभा. त्यामुळे यंदा पावसाने ही चांगलाच जोर धरला आणि धरणं तुडुंब भरली.










