कोथरुड

खिलारेवाडी तरूण मित्र मंडळाच्या वतीने कोरोना योद्ध्यांचा सन्मान

एरंडवणा : खिलारेवाडी तरूण मित्र मंडळाच्या वतीने कर्वे रोड भागातील कोरोना योध्दांचा सन्मान शिवाजीनगर मतदार संघातील आमदार सिद्धार्थ शिरोळे व नगरसेवक दीपक पोटे यांच्या हस्ते करण्यात आला. Corona Warriors honored on behalf of Khilarewadi Tarun Mitra Mandal

या कार्यक्रमचे आयोजन चित्रसेन खिलारे व हनुमंत पवार यांनी केले होते. यावेळी अध्यक्ष अजय मारणे व मंगल मिश्रा आणि मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते जेष्ठ नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार सिद्धार्थ शिरोळे म्हणाले की, कोरोनाच्या भयंकर काळात कोरोना योद्ध्यांनी केलेले काम आपण कधीच विसरू शकणार नाही. या बिकट काळात कोरोना योद्ध्यांनी धैर्याने या संकटाचा सामना केल्यामुळेच आपण कोरोना सारख्या संकटावर मात करू शकलो. हे संकट पूर्ण संपले नसले तरी आता आटोक्यात आले आहे. नागरिकांनी अजूनही खबरदारी घेणे आवश्यक आहे.

Img 20210116 wa0007
1609323038998 udyam bank big advt 30 dec 2020 scaled

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये