पुणे शहर

कर्वेनगर मधील स्मशानभूमीत अत्यावश्यक व मुलभूत सुविधांची कामे पूर्ण…

कर्वेनगर : कर्वेनगर मधील स्मशानभूमी मध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या असून स्मशानभूमीमध्ये आता सर्व अत्यावश्यक व मुलभूत सुविधा देण्यात आल्या आहेत. स्थानिक नगरसेविका लक्ष्मी दुधाने यांनी नगरसेवक सहयादी तरतुदी मधून ही कामे करून घेतली असून दोन दिवसात स्मशानभूमी चालू करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादीचे कोथरुड मतदार संघाचे अध्यक्ष स्वप्नील दुधाने यांनी सांगितले. Essential and basic facilities completed at Karvenagar Cemetery

या स्मशानभूमीमध्ये अनेक सुविधांचा अभाव होता. यामुळे कर्वेनगर परिसरातील अनेक अंतविधी हे वैकुंठाला होत होते. म्हणून नगरसेविका लक्ष्मी दुधाणे व स्वप्निल दुधाने यांनी नगरसेवक सहयादी तरतुदी मधून कर्वेनगर स्मशानभूमी मध्ये अत्यावश्यक विकासकामे करण्याचे ठरवले त्यानंतर प्रत्यक्षात निधी उपलब्ध करुन कामे चालू करून घेतली होती. आता ही कामे पूर्ण झाली आहेत.
                

Img 20210220 wa0136

स्मशानभुमी मध्ये एकूण चार शवदाहिनी करुण नवीन दशक्रिया विधी मंडप, नागरिकांकरिता मोठ्या संख्येने बसण्याकरिता बैठक व्यवस्था, अंत्यविधी करिता दोन ठिकाणी पाणीपुरवठा व्यवस्था, अंत्यविधीवेळी नातेवाईकांना केशकर्तन करण्याकरिता वेगळी बैठक व्यवस्था, महिलांकरिता व पुरुषांकरिता स्वतंत्र स्वच्छतागृह, अंत्यविधीचे सामान मिळावे या दृष्टिकोनातून स्वतंत्र एक वेगळी रूम म्हणजेच वखार, तसेच प्रवचन-कीर्तन याकरिता पुर्वी उभा करण्यात आलेला मात्र मोडकळीस आलेल्या सभामंडपाचे संपुर्ण नुतणीकरण ही सर्व विकासकामे या ठिकाणी आता करण्यात आलेली असल्याचे दुधाने यांनी सांगितले.
           

तसेच कर्वेनगर स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारापाशी पूर्वीपासुन एक महादेवाचे मंदिर आहे. या मंदिराची अवस्था जीर्ण झाल्याने त्या मंदिराला पूर्णपणे नव्याने दुरुस्त करून त्याच्यावर एक मंडप शेड उभारून महादेव मंदीराचेही संपुर्ण नूतनीकरण करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये