कोथरुड

गोसावी वस्ती, लक्ष्मीनगर येथील थकबाकीदार ग्राहकांचा खंडित केलेला वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी

सचिन फोलाने यांनी दिले महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन

कर्वेनगर : कर्वेनगर गोसावी वस्ती, लक्ष्मीनगर, डहाणूकर कॉलनी वस्ती भागातील गोरगरीब कष्टकरी  मोलमजुरी करणारी लोक  आधीच कोरोनामुळे खचून गेलेले आहेत. त्यातच वीज बिल भरले नाही म्हणून त्यांचे वीज कनेक्शन तोडण्यात आल्याने संबधित नागरिक हवालदिल झाले आहेत. त्यामुळे या भागातील विजतोड केलेल्या ग्राहकांची वीज जोडून देण्यात यावी अशी मागणी भाजप युवा मोर्चाचे पुणे शहर उपाध्यक्ष सचिन फोलाने यांनी महावितरणकडे केली आहे. Demand for restoration of power supply to outstanding customers

फोलाने यांच्याकडून या संदर्भातील निवेदन अतिरिक्त कार्यकारी अभियंता वारजे विभाग डहाणूकर कॉलनी यांना  देण्यात आले आहे. वीज पुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत करावा अन्यथा भाजपा युवा मोर्चा तो पूर्ववत करू देईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. 

Img 20210223 wa0156

वारजे उपभिग अंतर्गत येणाऱ्या सर्व महावितरणच्या थकबाकीदार ग्राहकांची वीज पुरवठा महावितरणकडून   खंडित केला जात आहे. उममुख्यमंत्र्यांनी विधानसभेत ‘जोपर्यंत काणताही निर्णय होत नाही तोवर ग्रहाकांची वीजजोड तोडू नका’ असे आदेश दिले आहेत. तरी जे
थकबाकिदार वीज बील भरू शकत नाहीत आणि आपण वीजपुरवठा खंडित केला आहे. अशा सर्व ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्याची मागणी फोलने यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Whatsapp image 2021 03 03 at 10. 04. 12 pm

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये