पुणे शहर

वारजेत महिला दिनानिमित्त महिलांनीच केला महिलांचा सन्मान

वारजे : जागतिक महिला दिनानिमित्त वारजे येथील रूणवाल पॅनोरमा सोसायटीत स्वच्छता करणाऱ्या मीना बनसोडे व सीमा आढाव या महिलांचा सोसायटीतील महिलांनी शाल, श्रीफळ व मिठाई देऊन सन्मान केला. Women honored women on the occasion of Women’s Day in Warje

सोसायटीच्या गणेश मंदिरात हा कार्यक्रम कोरोनाचे नियम पाळत पार पडला. याप्रसंगी  रंजना वाघ , वैशाली तांबे, नेहा ढोमसे, डॉ. सुनीता मुळे, सोनाली भाटे, शैला पाटील, चारू बहालकर ,पूनम झेंडे, व सोसायटीमधील अनेक  महिला उपस्थित होत्या.

Img 20210223 wa0156

महिलांनी प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. स्वच्छतेचे काम करणाऱ्या महिलांचे कार्य ही समाजाच्या आरोग्यासाठी बहुमोल आहे. न चुकता आपले स्वच्छतेचे काम त्या पार पाडत असतात आणि म्हणूनच  रूणवाल पॅनोरमा सोसायटी तील महिलांनी परिसराची स्वच्छता ठेवणाऱ्या महिलांचा सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव केला. स्वच्छतेचं महत्त्व महिला चांगल्या प्रकारे जाणतात. त्यामुळेच महिलांकडून महिलांचा झालेला हा सन्मान वेगळा आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये