कोथरुड कर्वेनगरमध्ये होम क्वारंटाईन मधील गरजवंत नागरिकांना शिवसेनेकडून मोफत जेवणाचे डबे..

कोथरुड मतदार संघाचे शिवसेना विभाग संघटक उमेश भेलके यांचा उपक्रम .
कोथरुड : कोरोनामुळे अनेक नागरिक होम क्वारंटाईन होऊन उपचार घेत आहेत. यामध्ये बऱ्याच नागरिकांच्या घरी जेवण तयार करण्यास कोणी नसल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पण कोथरुड कर्वेनगर मधील अशा गरजवंत नागरिकांची मोफत दोन वेळच्या जेवणाच्या डब्याची व्यवस्था करून कोथरुड मतदार संघाचे शिवसेना विभाग संघटक उमेश भेलके यांनी त्यांना मोठा आधार दिला आहे. Free food boxes from Shiv Sena to needy citizens in Home Quarantine in Kothrud Karvenagar ..
रोज होम क्वारंटाईन असलेल्या गरजवंत नागरिकांना जेवणाची वेळी घरपोच डबे पोहचवण्यात येत असून गेल्या आठ दिवसांपासून हा उपक्रम सुरू आहे. उमेश भेलके यांच्याकडून राबवण्यात येत असलेल्या या उपक्रमामुळे होम क्वारंटाईन असलेल्या बऱ्याच नागरिकांची गैरसोय दूर झाली आहे.

या उपक्रमाबाबत सांगताना उमेश भेलके यांनी सांगितले की, समाजाचे आपण नेहमी देणे लागत असतो. या भावनेतून आपण नेहमी अडचणीच्या काळात मदतीला पुढे जावे अशी शिकवण आमचे वडील माजी नगरसेवक स्वर्गीय उत्तम भेलके यांच्याकडून मिळाली आहे. मागील वर्षी माझे वडिल व माजी नगरसेवक शाम देशपांडे यांनी गरजवंतांना मोफत जेवणाचा डबा देण्याची व्यवस्था केली होती. आता वडिलांचा सामाजिक सेवेचा हा वारसा कायम पुढे चालू ठेवून हा उपक्रम सुरू आहे.
पुन्हा लॉकडाऊन झाल्यावर होम क्वारंटाईन असलेल्या अनेकांना जेवणाच्या समस्येला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे वडिलांनी सुरू केलेला हा उपक्रम नागरिकांच्या सेवेसाठी आपण पुन्हा सुरू केला आहे. या बरोबरच रस्त्याने कोणी भुकेला दिसला तर त्यांना ही जेवणाचे पार्सल देऊन त्यांची भूक शमवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सुरक्षेची काळजी घेत डबे पोहचवण्यासाठी मित्र परिवाराची मोलाची मदत होत असल्याचे भेलके यांनी सांगितले.









