राष्ट्रवादी काँग्रेस व ओंकार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने कोरोना काळात जीवनावश्यक वस्तुंची सेवा देणाऱ्या कोविड योद्ध्यांचा सन्मान..

कर्वेनगर : Pune city, karvenagar नगरसेविका लक्ष्मी दुधाने यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना महामारीत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जीवनावश्यक वस्तूंची नागरिकांना सेवा देणाऱ्या कर्वेनगर मधील कोरोना लढवय्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व ओंकार चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने सन्मान करण्यात आला.On behalf of the Nationalist Congress Party and Omkar Charitable Trust, honoring the covid warriors who served essentials service during the Corona period.
आपल्या कर्तव्याचा, धाडसाचा योग्य वापर केल्यामुळे अनेकांना सेवा करण्याची प्रेरणा या लढवय्यांमुळे मिळाली आहे. त्यांच्या या बहुमुल्य कार्याबद्दल त्यांना नगरसेविका लक्ष्मी दुधाने, राष्ट्रवादी कोथरुड मतदार संघाचे अध्यक्ष स्वप्नील दुधाने यांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.

यावेळी प्रमोद शिंदे, किशोर शेडगे, सचिन शिंदे, अमित गोडांबे, विशाल गायकवाड, प्रतिक पुंड, अनिल राठोड, स्वप्निल पाटील, आकाश गोळे, दिनेश तांबे आदी उपस्थित होते. पुढील तीन दिवस कर्वेनगर वारजे परिसरातील कोविड_योद्ध्यांचा सन्मान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व ओंकार चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने करण्यात येणार आहे.
कोरोनाच्या या कठीण काळात न घाबरता नागरीकांना जीवनावश्यक वस्तूंची सेवा देऊन व्यावसायिकांनी आपले कर्तव्य पार पाडले. त्यांनी दिलेल्या सेवेमुळे लॉक डाऊन च्या काळात नागरिकांना जीवनावश्यक वस्तुंसाठी पायपीट करावी लागली नाही. भीतीचे वातावरण असतानाही व्यावसायिकांकडून देण्यात आलेली ही सेवा कौतुकास्पद आहे. त्यामुळे या कोविड_योद्ध्यांचा सन्मान करण्यात आल्याचे स्वप्नील दुधाने यांनी सांगितले.



