महाराष्ट्र

मुळशीतील उरवडे गावाजवळील कंपनीला भीषण आग, 7 जणांचा मृत्यू

पुणे : पुण्यातील घोटावडे फाटा येथील कंपनीला भीषण आग लागली आहे. या आगीत  7 जणांचा मृत्यू झाला असून 10 कर्मचारी बेपत्ता आहे. आग लागली त्यावेळी कंपनी 37 कर्मचारी होते त्यापैकी 20 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे.(A fire broke out at a company near Urwade village in Mulshi, killing 7 people)

मुळशी तालुक्यामध्ये असलेल्या उरवडे गावाजवळ ही घटना घडली आहे. सॅनिटाइझर तयार करणाऱ्या SVS कंपनीला ही भीषण आग लागल्याची माहिती आहे. या आगीमुळं कंपनीमध्ये 10 ते 15 मजूर अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे 3 बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. कंपनीत अडकलेल्या मजुरांची सुटका करण्यासाटी JCB च्या साह्याने भिंती फोडून त्यांना बाहेर काढण्याचा प्रय्तन करण्यात येत आहे. तहसीलदार अभय चव्हाण यांनी याबाबत माहिती दिली असून, लवकरात लवकर आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.

आग लागेल्या SVS कंपनीमध्ये सॅनिटायझरचं उत्पादन केलं जातं. सॅनिटायझर हे अत्यंतत ज्वलनशील असतं, त्यामुळं आग मोठ्या प्रमाणावर भडकली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र आगीमध्ये नेमकी काही मनुष्य हानी झाली का? किंवा आग लागण्याचं नेमकं कारण याची अद्याप माहिती मिळालेली नाही. आग पूर्ण विझवल्यानंतर याबाबत माहिती मिळू शकणार आहे.

Img 20210522 wa0204

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये