कोथरुड, बावधन मधील मोठ्या सोसायट्यांमध्ये लसीकरण मोहीम राबविण्यात यावी..

कोथरुड : कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे रोखण्यासाठी कोथरूड – बावधन क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत बावधन, भुसारी कॉलनी व कोथरूड परिसरामध्ये असणाऱ्या मोठ-मोठ्या सोसायट्यांमध्ये लसीकरण मोहीम राबवण्यात यावी अशी मागणी नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी केली आहे. Vaccination campaign should be implemented in large societies in Kothrud, Bawadhan
याबाबत चे निवेदन दिलीप वेडे पाटील यांच्याकडून महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना देण्यात आले आहे. मोठ्या सोसायट्यांमध्ये क्लब-हाऊस किंवा योग्य जागा उपलब्ध आहेत. अशा ठिकाणी शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून लसीकरण मोहीम राबवणे शक्य आहे. मोठ्या सोसायट्यांमध्ये लसीकरण मोहीम राबविल्यास सोसायटीमधील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ति, घरेलू कामगार या सर्व प्रकारच्या नागरिकांना व 18 ते 44 वयोगटातील वर्गाला देखील लस घेणे सोईस्कर होणार असल्याचे वेडे पाटील यांनी म्हंटले आहे.

तरी पुणे शहरात कोरोना संसर्गावर संपूर्णपणे मात देण्यासाठी 100% लसीकरण पूर्ण करण्याच्या उद्देशाने विविध सोसायटींमध्ये लसीकरण राबविता यावे यासाठी सार्वजनिक संस्था व खाजगी हॉस्पीटल्सला पुणे महानगरपालिका अंतर्गत परवानगी देण्यात यावी अशी मागणी नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी पुणे मनपा आयुक्त मा.विक्रम कुमार यांना निवेदनाद्वारे केली आहे.



