पौड फाटा ते कर्वे पुतळ्यादरम्यान दुहेरी उड्डाणपूल : मेट्रोच्या बैठकीत चर्चा..

पुणे : मेट्रो आणि मेट्रोशी संबंधित विविध विषयांवर महत्त्वाची बैठक महापौर मुरलीधर मोहोळ, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार यांच्यात आज पार पडली. या बैठकीत मेट्रोबाबत विविध विषयांवर महत्त्वपूर्ण चर्चा झाली. Double flyover between Paud Fata to Karve statue: Discussion in Metro meeting ..
या बैठकीत कर्वे रस्त्यावरील दुहेरी उड्डाणपुलाचे काम वेगाने आणि वेळेत पूर्ण करणे यावर चर्चा झाली आहे. नुकतीच कोथरुड मधील पौड रस्त्यावर पुणे मेट्रो ची ट्रायल यशस्वी पार पडली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. संपूर्ण कर्वे रस्त्यावर ही मेट्रोचा प्रस्तावित मार्ग असून या रस्त्यावर ही मेट्रोचे काम लवकर व्हावे अशी अपेक्षा आहे.

पौड फाटा ते कर्वे पुतळ्यादरम्यान प्रस्तावित मेट्रोमार्गाचा विचार करुन दुहेरी उड्डाणपूल आणि HCMTR ऐवजी नियो मेट्रोचा विचार करुन त्याबाबतचा डीपीआर तयार करणे, याबाबत सविस्तर चर्चा या बैठकीत करण्यात आल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.



