बाबा धुमाळ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

वारजे : pune city, warje राज योग प्रतिष्ठान व वारजे हायवे परिसर विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष, माजी नगरसेवक बाबा धुमाळ यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक दिलीप बराटे, खडकवासला राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा अध्यक्ष काका चव्हाण, नगरसेविका सायली वांजळे, निवृत्ती येनपुरे, नीलम डोळसकर, भावना पाटील, सविता साष्टे, शांता नेवसे, सुरेश जाधव व राजयोग प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.
या शिबिरामध्ये जनरल तपासणी, ब्लड प्रेशर तपासणी, ई सी जी तपासणी, ब्लड शुगर, हिमोग्लोबीन, वजन उंची बॉडी मास इंडेक्स, सांधेदुखी, गुडघेदुखी व इतर अस्थी रोगांसंबंधित आजारांवर औषध उपचार व सल्ला, बी १२ लेव्हल, महिलांच्या कॅन्सर करता स्क्रीनिंग यासंदर्भातल्या तपासण्यांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात मोठ्या संख्येने महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली.










