महाराष्ट्र

पर्यटकांसाठी आनंदाची बातमी ; हिवाळी हंगामासाठी एमटीडीसी सज्ज.. विशेष सवलती मिळणार

मुंबई : – कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्यामुळे शासनाने जवळपास सर्वच पर्यटनस्थळे खुली करून पर्यटकांना दिलासा दिला आहे. पर्यटक देखील हिवाळी पर्यटन हंगामासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) पर्यटक निवासाचे आरक्षण करून पर्यटनाचे नियोजन करू लागल्याचे दिसून येत आहे.

गुलाबी थंडीची चाहूल आणि दीपावलीची सुट्टी असल्याने पर्यटकांची पावले पर्यटनस्थळांकडे वळू लागली असल्याने महामंडळानेही विविध सोयी सुविधा आणि विशेष सवलती जाहीर केल्या आहेत. विविध सोयी सुविधांसह पर्यटकांच्या स्वागतासाठी महामंडळ सज्ज असल्याने पर्यटकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे पुणे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी केले आहे.

Img 20211105 wa0169

काही दिवसांपूर्वीच महामंडळाच्या www.mtdc.co या नवीन संकेतस्थळाचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. या नवीन संकेतस्थळावरून महामंडळाच्या पर्यटक निवासाचे आरक्षण करता येणार आहे. महामंडळाची नुतनीकरण झालेली पर्यटक निवासे आणि प्रशिक्षित कर्मचारी पर्यटकांचा दीपावलीचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत.

Img 20211028 wa0117
Img 20211102 wa0316

एमटीडीसीमार्फत विविध घटकांना सवलती
महामंडळाने हिवाळी पर्यटन आणि दीपावली सुट्टयांसाठी नवनव्या संकल्पना राबविण्याची तयारी केली आहे. पर्यटकांसाठी विविध सवलती जाहीर केल्या आहेत. ज्येष्ठ नागरिक, शासकीय कर्मचारी यांना आगाऊ बुकिंगसाठी सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. सामाजिक बांधिलकी जपताना आजी-माजी सैनिक आणि दिव्यांगांसाठी विशेष सवलती दिल्या आहेत. ग्रुप बुकिंगमध्ये 20 खोल्यांपेक्षा जास्त बुकिंग असल्यास सवलत देण्यात येत आहे. शालेय सहलींसाठीही विशेष सवलती देण्यात येत आहेत. याबरोबरच 1 ऑक्टोबरपासून  ‘कॉम्लीमेंटरी ब्रेकफास्ट’ची सुरूवात केली असल्याने पर्यटक आनंद व्यक्त करीत आहेत.

पर्यटक निवासात पर्यटकांच्या सुरक्षेस सर्वोच्च प्राधान्य देताना शासनाने दिलेल्या कोरोना प्रतिबंधक मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे. उपाहारगृह, रिझॉर्ट आणि अनुषंगिक बाबींची तसेच परिसराची काटेकारेपणे स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. पर्यटकांना तातडीच्या वैद्यकीय कारणांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून आवश्यकता भासल्यास पर्यटकांच्या मागणीवरून पर्यटक निवासात औषधोपचार उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

Fb img 1636173812760
Fb img 1636173850038

शरीराचे तापमान मोजणारी यंत्रणा, सॅनिटाईजर अशी व्यवस्था पूर्वीपासूनच करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले आहे. महामंडळाच्या उपहारगृहांमध्ये गर्दी टाळण्यासाठी पर्यटकांना त्यांच्या खोल्यांपर्यंत अल्पोपहार, जेवण आणि अन्य अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात येत आहेत. तसेच शासनाच्या सर्व नियमांच्या अधीन राहून ‘प्री-वेडींग फोटोशूट’ आणि ‘डेस्टीनेशन वेडींग’चीही सोय करण्यात येणार आहे. काही रिझॉर्टवर वायफाय सुविधाही पुरविण्यात येत आहे. त्यामुळे या पर्यटक निवासात राहून मुलांना ऑनलाईन क्लास तर पालकांना ऑनलाइन कामकाजही करता येणार आहे.

Fb img 1636173927247

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सर्व पर्यटक निवासांचे आरक्षण सुरू असून www.mtdc.co या संकेतस्थळावर ऑनलाईन आरक्षणही सुरू करण्यात आले आहे, असे श्री. हरणे यांनी सांगितले.

Fb img 1636176466159
Fb img 1636172805584
Fb img 1636172878177
Img 20211101 wa0234
Fb img 1636175422079
Img 20211106 wa0013 1
Fb img 1636085806327
Img 20211106 wa0032
Img 20211102 wa0292
Img 20201113 wa0322
Screenshot 2020 1113 155835
Screenshot 2020 11 15 08 47 31 83
Img 20211102 wa0361
Img 20211101 wa0255
Img 20211029 wa0063
Img 20211102 wa0377
Img 20211102 wa0370
Img 20211102 wa0371
Img 20211102 wa0037
Img 20211028 wa0241
Img 20211102 wa0015
Img 20211106 wa0048
Img 20211027 wa0188
Img 20211102 wa0016
Fb img 1636186135551
Img 20211029 wa0160
Img 20211027 wa0183
Fb img 1636187308170
Img 20211027 wa0185
Img 20211029 wa0095

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये