कोथरुड

पल्लवी गाडगीळ यांच्या वाढदिवसा निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

कोथरूड : सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कोथरूड भाजपा महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा व निता केअर फाउंडेशनच्या अध्यक्ष पल्लवी समीर गाडगीळ यांनी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पाचशेहून अधिक गरजू व्यक्तींना मोफत चटई वाटप केले.

महाराष्ट्र प्रदेश चिटणीस नगरसेवक धीरज घाटे, भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, पल्लवी गाडगीळ यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्वे रोड वरील अंबर हॉल येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था पुणे केंद्राचे प्रमुख मकरंद मानकीकर आणि कार्यकारिणीचे सदस्य आयडियल सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार वडावकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी स्थानिक नगरसेवक भाजपाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तसेच कोथरूड भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकारी उपस्थित होते.तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री तळेसरा यांनी केले.

Img 20211105 wa0169

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये