राजकीय

नितेश राणेंना 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

मुंबई : भाजप आमदार नितेश राणे यांना दिवाणी न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, त्यामुळे 4 फेब्रुवारीपर्यंत नितेश राणेंचा मुक्काम कोठडीत असणार आहे हे आता स्पष्ट झालं आहे. शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात राणेंच्या अडचणी वाढल्या आहेत. राकेश परब यांनाही 4 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दिवाणी न्यायालयात नितेश राणे शरण गेले होते. त्यानंतर याप्रकरणी युक्तिवाद झाला. कणकवली पोलिस स्टेशनमध्ये आता आमदार निलेश राणे यांची कसून चौकशी केली जाणार आहे. आता नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर ते जामीनासाठी अर्ज करु शकतात. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संतोष परब यांच्यावर हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या हल्ल्यामागे नितेश राणेंचा हात असल्याचा गंभीर आरोप संतोष परब यांनी केला होता.

नितेश राणेंवर आरोप करण्यात आल्यानंतर अनेक दिवस नितेश राणे हे अज्ञातवासात होते. आधी जिल्हा सत्र न्यायालयाननं, त्यानंतर हायकोर्टानं आणि मग सुप्रीम कोर्टानंही त्यांना जामीनाबाबत दिलासा दिलेला नव्हता. अखेर आता न्यायालयानं नितेश राणेंना पोलिस कोठडी सुनावली असून आता नितेश राणेंना अटक होणार, यावर शिक्कामोर्तब झालं आहे. नितेश राणेंचा जामीन 4 वेळा फेटाळण्यात आला आहे. शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात पोलिसांनी नितेश राणेंचा शोध सुरू केल्यानंतर नितेश राणे सर्वात आधी अज्ञातवासात गेले आणि कणकवली न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली, मात्र तिथे त्यांना पहिला दणका बसला आणि त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला. त्यानंतर त्यांनी तातडीने हायकोर्टात धाव घेतली. मात्र तिथेही त्यांना दुसरा दणका बसला आणि हायकोर्टानेही त्यांचा जामीन फेटाळला. त्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली मात्र सुप्रीम कोर्टानेही त्यांना दिलासा दिला नाही. सत्र न्यायालयातही त्यांची निराशा झाली.

शिवसैनिक संतोष परब हल्लाप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांचा जामीन अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. पण नितेश राणेंनी उच्च न्यायालयातील अर्ज मागे घेतल्याची माहिती वकील सतीश माने-शिंदे यांनी दिली. त्यानंतर नितेश राणे कणकवली दिवाणी न्यायालयात शरण गेले आणि त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर न्यायालयाने पोलिसांना बाजू मांडण्यास बोलावले. त्यानंतर साधारण तीन तास त्यांच्या प्रकरणावर सुनावणी चालल्यानंतर कोर्टाने त्यांना दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे. राणेंना जामीन द्यावा अशी मागणी त्यांच्या वकिलांकडून करण्यात येत होती, तर पोलिसांनी नितेश राणेंची पोलीस कोठडी मागितली होती. कोर्टाने पोलिसांची आणि सरकारी वकिलांची ही मागणी मान्य केली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये