राष्ट्रीय
महापालिका निवडणूक : सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला केली ही सूचना

नवी दिल्ली : ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) तिढ्यामुळे राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. आता सुप्रीम कोर्टाने रखडलेल्या निवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने आता न थांबता जाहीर करावा अशी सूचना केली आहे. ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित असणाऱ्या जागा ह्या खुल्या प्रवर्गातील म्हणून जाहीर करण्यात याव्यात असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

सुप्रीम कोर्टाच्या या सूचनेनंतर राज्य निवडणूक आयोग कोणती भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. याआधी मागील विधीमंडळ अधिवेशनाने ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्यात येऊ नये असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला होता. मात्र, आता सुप्रीम कोर्टाच्या सूचनेनंतर निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर लक्ष लागले आहे.






