पुणे शहर

पुण्यातील बावधन परिसरात हेलिकॉप्टर कोसळलं

पुणे: पुण्यातील बावधन परिसरात हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली आहे. धुक्यामुळे हे हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती मिळत आहे. या हेलिकॉप्टर अपघातात 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

आज सकाळी सात वाजता हि घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.बावधन बुद्रुक परिसरामध्ये हेलिकॉप्टर कोसळले. दाट धुक्यांमुळे डोंगराळ भागामध्ये हे हेलिकॉप्टर कोसळल्याचे सांगितले जात आहे. हेलिकॉप्टर कोसळल्याची ही महिनाभरातील दुसरी घटना आहे. पुणे पोलिसांकडून याचा तपास केला जात आहे.

घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. हे हेलिकॉप्टर कुठून कुठे जात होते, त्यामध्ये कोण प्रवास करत होते? या सर्व बाजूने पोलिस तपास करत आहेत.

Img 20240404 wa001528129
Img 20240404 wa0016281291197243699799508498
Img 20240404 wa0012281298841886320058264868

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये