पुणे शहर

प्रजासत्ताक दिनी राष्ट्रवादी काँग्रेसचा अनोखा उपक्रम, पक्षाच्या महिनाभरातील कार्यक्रमांची माहिती मिळणार मासिकाच्या माध्यमातून – दीपक मानकर

पुणे : भारताचा 75 वा प्रजासत्ताक दिन आज (ता २६)  देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पुणे शहराध्यक्ष विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने नारायण पेठेतील गुप्ते मंगल येथील पक्ष कार्यालयात शहराध्यक्ष दीपक मानकर व शंकरराव शिंदे यांच्या हस्ते झेंडावंदन करत प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी पक्षातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

गुप्ते मंगल कार्यालय येथे पार पडलेल्या कार्यक्रमात प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अनोखा उपक्रम राबवण्यास सुरुवात करण्यात आली असून “राष्ट्रवादी काँग्रेस टुडे” या मासिकाचे प्रकाशन करण्यात आले.  उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार व पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसकडून महिनाभरात राबवण्यात येणारे उपक्रम या मासिकाच्या माध्यमातून प्रकाशित केले जाणार आहेत.  कार्यकर्त्यांनी महिन्याभरात केलेल्या कामांचे माहितीसह फोटो या मासिकामधून समाजापर्यंत पोहोचणार असल्याने सर्वांच्या कामाला एक दिशा मिळेल, असा विश्वास दीपक मानकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.  

Img 20240126 wa00257124027257681892568

यावेळी शहर कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, प्रदेश प्रतिनिधी महेश शिंदे, माजी नगरसेवक प्रमोद निम्हण, माजी विरोधी पक्षनेते दत्ता सागरे, युवक अध्यक्ष समीर चांदेरे, युवती अध्यक्ष पूजा झोळे, विद्यार्थी शुभम माताळे, अल्पसंख्याक अध्यक्ष समीर शेख, सांस्कृतिक अध्यक्ष विजय राम कदम, विनोद काळोखे,  कोथरूड अध्यक्ष हर्षवर्धन मानकर, अभिषेक बोके, सरचिटणीस रुहिसाबा सय्यद, शालिनी जगताप, सेवादल अध्यक्ष शशिकला कुंभार, विजय जाधव, विजय बापू डाकले, विपुल म्हैसुरकर,नानासाहेब अबनावे, राजेंद्र पवार, मुस्ताक उमर पटेल, महेश पाटील, माधवी मोरे, वनिता काळे, नुरजहा शेख, नूतन शिवरकर, तेजल दुधाणे, स्मिता दातीर, गजानन लोंढे, शांतीलाल मिसाळ, संतोष नांगरे, सुप्रिया कांबळे,  नरेश जाधव, अजय दराडे, राहुल पायगुडे, संतोष बेंद्रे, राहुल तांबे, मुनीर सय्यद, संदीप गाडे, चारुदत्त घाडगे, आनंद तांबे, माणिक दुधाणे, रामदास गाडे, जयश्री जोरी, माधवी मोरे,वनिता जगताप, बाळासाहेब आहेर, महेश वाघ, शांतीलाल मिसाळ, ऐश्वर्या मारणे, नम्रता बोंदर, शिवानी पोतदार, चित्रलेखा दाभेकर, अजय मोरे, विनोद पवार, विशाल गद्रे, श्रीनिवास मेहता, राधिका वाईकर, सुमान कुरेशी, अलिम शेख, मायकल साठे, पुष्पा गाडे, राजा गायकवाड, संजय चव्हाण, उमेश रसालकर, सुप्रिया कांबळे,राजश्री शिंदे, स्वाती गायकवाड, विजया कदम, सनी किरवे, दयानंद माने, यत्रज पिल्ले, संतोष पाषाणकर, विक्रम मोरे,मारुती अवरगंड, रोहिदास यनपुरे, सागर करपे, मीना भगत, संजय लाड, नवनाथ खिलारे, अरुण गवले, बाबू शेख, शाम शेळके, अशोक जाधव, रिजवाना मुलाणी, प्रकाश शेळके, रतन वैराट,हरीश ओव्हाळ, राजा सावंत, दत्तात्रय जाधव, राजू संबेत्रा, विजय शिवरकर, संजय लाड यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Img 20240126 wa00266075144814364876393

मुस्लिम महिला कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

उपमुख्यमंत्री अजित पवार हे महायुतीमध्ये सहभागी झाल्यानंतर इतर पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा ओढा राष्ट्रवादी काँग्रेसकडे वाढल्याचे दिसत आहे. आज झालेल्या कार्यक्रमामध्ये मुस्लिम महिलांनी मोठ्या संख्येने पक्षप्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सरचिटणीस रुहीसबा सय्यद यांच्या विशेष प्रयत्नांतून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तिपत्राचे वाटप करण्यात आले.

Img 20230717 wa0012281298961742807603730839
Img 20231109 wa001228129905032016030159557
Img 20230511 wa0002282292969174931887579613

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये