पुणे शहर
राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोथरूड विधानसभेच्या वतीने दृष्टीहीन विद्यार्थिनींनी ‘प्रजासत्ताक दिन’ साजरा

पुणे : पूना स्कुल फॉर ब्लाइंड गर्ल्स’ (कोथरूड) मध्ये दृष्टीहीन विद्यार्थिनींनी ‘प्रजासत्ताक दिन’ राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोथरूड विधानसभेच्या वतीने साजरा करण्यात आला . जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले, तसेच खाऊ, झेंडे आणि फुगे देऊन शाळेचे वातावरण आनंदमय झाले असे युवक अध्यक्ष गिरीश गुरनानी म्हणाले.
‘समाजात जनजागृती निर्माण करणे आणि सामाजिक उपक्रमातून मदत करणे हा हेतू या उपक्रमाचा होता’ असे गुरनानी म्हणाले. ‘झेंडा, फुगे, खाऊ आणि जीवनावश्यक वस्तू मिळाल्यानंतर मुलींच्या चेहऱ्यावरील आनंद मनाला समाधान देणारा होता. या वेळी अमोल गायकवाड ,आयुष बोडके,पवन शिंदे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.










