पुणे शहर

रतन टाटा पुण्यातील कोथरूड भागात…

पुणे : कोविड सारख्या मोठ्या जागतिक संकटाच्या काळातही, नेहमी गरजू व्यक्ती… आणि आपल्या भारत देशाचा पहिला विचार करणारे, अत्यंत दानशुर, टाटा उद्योगसमुहाचे सर्वेसर्वा प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा मागील आठवड्यात पुण्यातील कोथरूड भागात आले होते. गणंजय चौक, वुडलँड सोसायटी, कोथरूड पुणे,येथे.निमीत्त होते, ते म्हणजे त्यांच्या त्या काळच्या चीफ डायरेक्टर  महिला सहकारी यांच्या घरी सदिच्छा भेट देण्याचे.

एवढा थोर… महान माणुस पण कमालीचा साधेपणा. अत्यंत साधा वेष, अन् आपल्या सहकार्याच्या घरात अगदी घरच्यांसारखाच वावर. घरातील सर्व लहानथोरांची विचारपुस करून, खास मराठी आणि त्यातल्या त्यात पुणेरी पाहुणचार स्वीकारून स्वारी पुन्हा मार्गस्थ झाली.

कुठेही गाजावाजा नाही. सत्कार चमत्कार कार्यक्रम नाही. साग्रसंगीत स्वयंपाक नाही, पाहुण्यांच्या लांबलचक पंगती नाहीत. आयोजकांनीही कमालीची गुप्तता पाळुन, हा कार्यक्रम यशस्वी केला. व शतकातील या महान उद्योगपतीला पुन्हा या अस म्हणत निरोप दिला. त्यांनीही त्यावर लगेच स्मित करीत जरूर असा दुजोरा दिला.

1609323038998 udyam bank big advt 30 dec 2020

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये