कोथरुड

कोथरूड मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार)
मजबूत पक्षबांधणी ; जम्बो कार्यकारिणी जाहीर, एकूण २१२ नवीन पद नियुक्त्या

तळमळीच्या कार्यकर्त्यांना पक्षाच्या पदावर काम करण्याची संधी : दीपक मानकर

कोथरूड : कोथरूड मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार)मजबूत पक्षबांधणी केली असून पक्षाच्या वतीने जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आली. पद नियुक्ती कार्यक्रमात पक्षातील पदावर काम करण्यासाठी उत्सुक असणाऱ्या कार्यकर्त्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता.

Img 20231205 wa00265253345899944697715

यावेळी बोलताना दीपक मानकर म्हणाले, पक्षाचा कार्यकर्ता हा समाजमन ओळखणारा असावा, समाजाप्रती काम करण्याच्या तळमळ त्याच्याकडे असावी कारण ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो अशी भावना त्याच्याकडे हावी. आणि आशाच तळमळीच्या कार्यकर्त्यांना आज पक्षाच्या पदावर काम करण्याची संधी देत आहोत.

लवकरच निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. त्यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तयारी सुरू केली आहे. पक्षवाढीच्या दृष्टीने व संघटना मजबूत करण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी लवकरात लवकर पदाधिकारी, कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्याबाबत मार्गदर्शन केले होते. याच दृष्टीने आगामी निवडणुका लक्षात घेऊन पक्षावरील निष्ठा आणि काम करण्याची ऊर्जा पाहून नियुक्तीपत्रकांचे वाटप करण्यात येत आहे. कोथरूड मधील पदनियुक्त कार्यक्रमातील उत्साह पाहता पक्षात काम करण्यासाठी अनेक जण इच्छुक असल्याचे दिसत आहे. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे काम समाजातील प्रत्येक स्तरात पोहचवून नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावा.

कोथरूड विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन मानकर यांनी या पदनियुक्ती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी, राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या पुणे शहराध्यक्ष प्रिया गदादे, युवक काँग्रेसचे पुण्याचे शहराध्यक्ष समीर चांदेरे, कोथरूड विधानसभेच्या महिला अध्यक्षा तेजल दुधाने तसेच कोथरूड युवक अध्यक्ष मोहित बराटे, विद्यार्थी सेलचे अध्यक्ष शुभम माताळे यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

Img 20230812 wa0001281295283768095978676207

यावेळी कोथरूड मतदार संघ फादर बोडीवर विविध पदांवर २५ जणांची नियुक्ती करण्यात आली तसेच कोथरूड राष्ट्रवादी युवक काँग्रेसवर ६६ युवकांची नियुक्ती करण्यात आली. महिला आघाडीत ११४ महिला पदधिकाऱ्यांची नेमणूक केली गेली आहे. तसेच आरोग्य सेल व सामाजिक न्याय विभागवर पद नियुक्त्या करण्यात आल्या असून यावेळी एकूण २१२ नवीन पद नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. कोथरूड मतदार संघातील प्रत्येक भागातील कार्यकर्त्याला पक्षाच्या पदावर काम करण्याची संधी देण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोथरूड मतदार संघातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांमुळे पक्षाचे काम तळागाळापर्यंत पोहचणार आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महायुतीची कोथरूड मतदार संघातील ताकद या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांमुळे वाढली असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Img 20231111 wa0004281292791598778819580777
Img 20230511 wa0002282292722773256594657904

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये