पुणे शहर

पुणेकरांना अजित पवारांची दिवाळी भेट

पुणे :  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणेकरांना दिवाळीआधी मोठी भेट दिली आहे. पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजित पवारांचं पुणेकरांसाठी महत्वाची घोषणा केली. पुण्यात दिवाळी पहाट कार्यक्रमांचं आयोजन करण्यास परवानगी देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. दिवाळीनंतर थिएटर्स 100 टक्के क्षमतेनं सुरु करण्याचा विचार असल्याचंही त्यांनी सांगितलं. पुण्यातील ग्रामीण भागातील आठवडे बाजार देखील सुरु करण्यास परवानगी देण्यात आली असल्याचं पवार यांनी सांगितलं.

गेल्या वर्षी कोरोना संकटामुळे पुणेकर रसिकांना आनंद देणाऱ्या दिवाळी पहाट कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले नाही. मात्र यंदा पालकमंत्री अजित पवार यांनी दिवाळी पहाट कार्यक्रमांना परवानगी दिल्याने रसिक प्रेक्षकांना सुरेल गीतांच्या मैफिलीचा मनमुराद आस्वाद घेता येणार आहे. पुणे महापालिका निवडणुक जवळ आल्याने दिवाळी पहाट कार्यक्रमांचे आयोजन करायचे की नाही ? याबाबत इच्छुक उमेदवार चिंतेत पडले होते. मात्र या निर्णयामुळे त्यांनाही प्रचाराचा प्रारंभ करता येणार आहे.

Screenshot 2021 10 14 09 26 41 50

त्यांनी सांगितलं की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल भविष्यात मेट्रोचे काम झाल्यानंतर वाहतूक कोंडी होउ नये यासाठी पाडला.  अनेक तंत्रांचा वापर करण्यात आलाय.  हे खरे आहे की नवीन काम करण्याची जबाबदारी असलेल्या टाटा कंपनीला काही अडचणी येतायत. पण दिवाळीनंतर हे  काम सुरु करण्यात येईल, असंही ते म्हणाले.  पुण्यातील जंबो कोविड सेंटर कायम ठेवायचे की काढून टाकायचे याचा निर्णय दिवाळीनंतर घेऊ, असंही ते म्हणाले.

Img 20211022 wa0002

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये