कोथरुड

कोथरुड मध्ये गौरी गणपती सजावट स्पर्धेचा बक्षिस वितरण संपन्न..

कोथरुड : pune city, Kothrud दिपाली संतोष डोख यांच्या वतीने घेण्यात आलेल्या गौरी – गणपती सजावट स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ नुकताच पार पडला. यावेळी आयोजित मराठी हिंदी गीतांच्या मैफिलीत सादर झालेल्या गीतांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांची सायंकाळ आनंदमयी ठरली.  

या स्पर्धेत संगीता संजय दहिभाते, अमृता संतोष ठोंबरे, लता दयावान बचुटे यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळाला त्यांना व स्पर्धेतील इतर विजेत्यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी ज्योती सूर्यवंशी, सिताराम तोंडे पाटील, संजय खोपडे, अर्चना चंदनशिवे, पूजा शिर्के, आशा जमदाडे, संगिता मोहोळ, सारिका चोरघडे, शामली मराठे व प्रभागातील ज्येष्ठ महिला भगिनी उपस्थित होत्या.

याप्रसंगी बापू चौधरी, दिपाली ढमाळ, गोपाळ धुमाळ,  ओंकार कदम यांच्या संगीत मैफिलीने व अजित वाराणशीवार यांच्या सूत्रसंचालनाने कार्यक्रमाची रंगत वाढवली. सर्व महिला भगिनींना दिपाली संतोष डोख यांच्या वतीने भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी संघर्ष मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

Img 20211014 wa0004
Img 20211019 wa0327 1

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये