राष्ट्रीय
राजस्थानातही पर्यायी कृषी विधेयके

जयपूर: मोदी सरकारच्या कृषी कायद्यांना पर्यायी चार विधेयके पंजाबमधील काँग्रेस सरकारने मंजूर केली. त्यापाठोपाठ राजस्थानमधील गेहलोत सरकारने पावले टाकली आहेत.
शेतकरी दर शाश्वती आणि शेती सुविधा करार, जीवनावश्यक वस्तू आणि शेतकरी व्यापार आणि वाणिज्य अशी विधेयके संसदीय कार्यमंत्री शांती धारिवाल यांनी मांडली आहेत.

काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये केंद्र सरकारच्या कायद्यांना विरोध करणारे कायदे मंजूर करावेत, असे . कॉंग्रेस नेतृत्वाने सुचविले. त्या दृष्टीने पंजाबने पहिले पाऊल टाकले, राजस्थानने तयारी केली, महाराष्ट्रातील काँग्रेस काय करणार ? याकडे लक्ष आहे.






