महाराष्ट्र

अंकिता हर्षवर्धन पाटील ठाकरेंच्या घरची सून ; निहार बिंदुमाधव ठाकरे यांच्या सोबत विवाह..

मुंबई : स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुतणे निहार बिंदूमाधव ठाकरे आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या आणि पुणे जिल्हा परिषद सदस्य अंकिता हर्षवर्धन पाटील यांचा विवाह शाही थाटात आज मुंबईतील ‘ताज’ हॉटेलमध्ये संपन्न झाला.

या निमित्ताने ठाकरे आणि पाटील घराण्याचे नवीन ऋणानुबंध तयार झाले आहेत. अनेक दिवसांपासून या विवाहाची चर्चा होती, काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांना लग्नासाठी निमंत्रण देण्यासाठी हर्षवर्धन पाटील आणि अंकिता पाटील दोघेही गेले होते, त्या फोटोचीही बरीच चर्चा होती. आज अखेर हा विवाहसोहळा संपन्न झाला आहे.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू असलेले निहार ठाकरे यांचं एलएलएमपर्यंत शिक्षण झालं आहे. त्यांनी वकिली व्यवसायात आपला जम बसवला आहे. निहार यांचे वडील बिंदुमाधव यांचं १९९६ मध्ये अपघाती निधन झालं होतं. त्यांच्या निधनानंतर बाळासाहेबांना मोठा धक्का बसला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जयदेव ठाकरे हे निहार यांचे सख्खे काका आहेत. तर राज ठाकरे हे चुलत काका आहे. अंकिता पाटील आणि निहार ठाकरे आज मुंबई येथे ‘ताज’ हॉटेलमध्ये विवाहबद्ध झाले असून राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी वधूवरांना शुभ-आशीर्वाद दिले आहेत.

Screenshot 20211227 1402344603556305344739789

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये