महाराष्ट्र

गर्भवती वनरक्षक महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण ; पहा व्हिडिओ


महिला आयोग व आदित्य ठाकरेंकडून दखल..

पुणे : वनरक्षक महिला कर्मचाऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची गंभीर घटना घडली आहे. सातारा जिल्ह्यातील एका गावात माजी सरपंचाने वनरक्षक महिला कर्मचाऱ्याला केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.

https://twitter.com/PraveenIFShere/status/1484019049596350465?t=7_y8ypcBzvKzS5yF6MqtUA&s=09

पळसवडे गावचे माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी आपल्या पत्नीसोबत तीन महिन्यांच्या गर्भवती महिला वनरक्षक सिंधू सानप आणि त्यांचे पती सूर्याजी ठोंबरे यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. सिंधू सानप आणि सूर्याजी ठोंबरे गस्त घालण्यासाठी आले असता त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. व्हायरल झालेल्या व्हिडीओत दांपत्य सिंधू सानप यांना अमानुषपणे मारहाण करत असल्याचे दिसत आहे.

घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर माजी सरपंचाविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी माजी सरपंच रामचंद्र जानकर आणि त्यांच्या पत्नीला अटक केली आहे.
राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीही या घटनेची दखल घेतली आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत सांगितलं की, “आरोपींना आज सकाळी अटक करण्यात आली असून कठोरात कठोर कारवाई केली जाईल. अशा प्रकारची कृत्यं सहन केली जाणार नाहीत”. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली असून याबाबत सातारा पोलिसांना कडक कारवाईचे निर्देश देण्यात आले असल्याचे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले आहे.

Img 20220119 wa0206

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये