पुणे शहर

राष्ट्रवादी अर्बन सेलच्या शहर सुधार व महापालिका समन्वय समितीच्या समन्वयक पदी स्वप्नील दुधाने

पुणे : पुणे शहराच्या राष्ट्रवादी अर्बन सेलच्या शहर सुधार व महापालिका समन्वय समितीच्या समन्वयक पदी राष्ट्रवादीचे पुणे शहर उपाध्यक्ष स्वप्नील दुधाने यांची निवड करण्यात आली आहे.

खासादर वंदना चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात दुधाने यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, पुणे शहर राष्ट्रवादी अर्बन सेलचे अध्यक्ष नितीन कदम तसेच पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

आजपर्यंत समाजकार्यात आपले योगदान देण्याचा प्रयत्न करत आलो आहे. याच प्रयत्नांचे यश म्हणजे ही निवड आहे.   माझ्यावर दाखवलेल्या विश्वासास पात्र ठरण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचे स्वप्नील दुधाने यांनी निवडीनंतर सांगितले.

Img 20220118 wa00126707376222918832787

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये