महाराष्ट्र

पोलीस भरतीच्या पोस्टरवर चंद्रकांत पाटील यांना नेटकऱ्यांचा सवाल

पुणे : सुरू झालेल्या पोलीस भरती संदर्भात पुणे जिल्ह्याचे पालक मंत्री व उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ट्विटरवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टवर कमेंट करताना अनेक सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केले आहेत.

बराच काळ रखडलेली राज्यातील पोलीस भरती आजपासून अनेक जिल्ह्यांमध्ये सुरू झाली. भरतीसाठी तरुणांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. 14 हजार तरूणांना पोलीस दलात नोकरी देण्यासाठी ही भरती प्रक्रिया सुरू होण्यासाठी युती सरकार सत्तेवर यावं लागलं…युती सरकार यापुढेही जनहिताचे निर्णय घेईल असे चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले आहे.

यावर कमेंट करताना एका नेट कऱ्याने म्हंटले आहे की, 100% पोलिस भरती सुरु झाली दादा.
100 % प्राध्यापक भरती कधी सुरु करणार?
आपण ज्या 2088 पदांचा उल्लेख करत आहात ती
पदे 2017 ची मंजूर आहेत आणि आता 2023 चालू
झालंय.

दुसऱ्याने असे म्हंटले आहे की, कार्यक्षम मंत्री असा नावलौकिक असताना तुम्ही 2023 मध्ये 2017 चीच भरती करत आहात…यामुळे तुमच्या नावलौकिकाला तडा जात
आहे साहेब.

Img 20221126 wa02126927299965323449855

आदरणीय साहेब कृपया प्राध्यापक भरती करावी आणि ती सुद्धा एमपीएससी मार्फतच अशी एकाने मागणी केली आहे. तर फक्त पोलीस भरातीच का असा सवाल एकाने उपस्थित केला आहे.

प्राध्यापक भारतीचा 30 ते 40 लाख रुपये रेट आहे ऐका जागेचा मंत्रीमहोदय.. MPSC सारखा घटनात्मक आयोग असताना भरतीचे अधिकार संस्थाचालकांना का? उघड उघड भ्रष्ट व्यवस्थेचा पुरस्कार सुरू आहे..अशी खंत एकाने उपस्थित केली आहे.

पोलीस भरतीचा निर्णय चांगला असल्याचं म्हणत कौतुक केले आहे. अशा अनेक कमेंट पोस्टरवर करताना अनेक सवाल उपस्थित केले आहेत तर काहींनी आपल्या मागण्या व्यक्त केल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये