पावश्या गणपती मंदिरासमोर भाजपचे घंटानाद आंदोलन

वारजे : महाराष्ट्र राज्यातील सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे सामान्य नागरिकांसाठी खुली करण्याच्या मागणीसाठी वारजे माळवाडी परिसरातील प्रमुख देवस्थान असलेल्या पावश्या गणपती मंदिरासमोर भाजपच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले .
विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या निर्देशानुसार आमदार भिमराव तापकीर , शहराध्यक्ष जगदीश मुळीक व खडकवासला अध्यक्ष सचिन मोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. आंदोलनाचे संयोजन स्वीकृत सभासद सचिन दशरथ दांगट यांनी केले होते.
यावेळी अरूण दांगट , अरविंद जोशी , अमजद अन्सारी , आनंद देशपांडे , विकास गंपले , अशोक दहिरे , रेणुका मोरे , वर्षा पवार , सुप्रिया निंबाळकर , वंदना काकडे , परशुराम पुजारी , व्यंकटेश दांगट , आशा मोरे , यल्लु हूसकोटी , वनिता कांबळे आदी उपस्थित होते.



