कोथरुड

कोथरूड भाजपा युवा मोर्चाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात १२८ जणांचे रक्तदान..

कोथरुड :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात रक्ताची कमतरता भासू लागली असल्याने वेळेची गरज आणि सामाजिक बांधिलकीचे भान लक्षात घेऊन भारतीय जनता युवा मोर्चा कोथरुडच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात  सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत १२८ जणांनी रक्तदान केले. Blood donation of 128 people in the blood donation camp organized by Kothrud BJP Yuva Morcha.

या शिबिराला भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील,पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ,शहराध्यक्ष जगदीश मुळीक, संघटन मंत्री रवी अनासपुरे, संघटन
सरचिटणीस राजेश पांडे यांनी भेट दिली. भारतीय जनता युवा मोर्चा कोथरुड मतदार संघाचे अध्यक्ष दुष्यंत मोहोळ यांनी या रक्तदान शिबिराचे संयोजन केले होते.

IMG 20210223 WA0156

यावेळी नगरसेवक दीपक पोटे , युवा मोर्चाचे शहराध्यक्ष राघवेंद्र मानकर, नगरसेविका वासंती जाधव, हर्षाली माथवड, नगरसेवक जयंत भावे, कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, निलेश कोंढळकर, गणेश वरपे, तसेच मंडलातील सर्व युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.

ओम ब्लड बँक च्या सहकार्याने हे शिबिर घेण्यात आले. सध्या कोरोना संसर्गामुळे शहरात रक्ताचा तुटवडा जाणवत असून तो भरून काढण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या सूचनेनुसार व मार्गदर्शनानुसार भारतीय जनता युवा मोर्चा कोथरुड च्या वतीने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे युवा मोर्चाचे कोथरुडचे अध्यक्ष दुष्यंत मोहोळ यांनी सांगितले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये
Close
Close