१० वी परिक्षेत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या मुला मुलींना ११ व १२ वी च्या शिक्षणासाठी दत्तक घतले जाणार..

भाजपचे विनोद मोहिते यांनी दिली माहिती.
विद्यार्थ्यांना करिअर घडविण्याची योग्य संधी
पुणे : 10 वी च्या परिक्षेत 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या मुला- मुलींना 11 वी, 12 वी च्या शिक्षणासाठी दत्तक घेतले जाणार असल्याची माहिती लोकसेवा प्रतिष्ठानच्या नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी विद्यालय, फुलगाव यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
याबरोबरच दहावीच्या परिक्षेत 85 ते 90 टक्के पडलेल्या विद्यार्थ्यांना 30 टक्के तर 80 ते 85 टक्के पडलेल्या विद्यार्थ्यांना 20 टक्के फी मध्ये सवलत देण्यात येणार असल्याच्या योजनेची माहिती यावेळी देण्यात आली.
पत्रकार परिषदेला योजनेचे प्रमुख डॉ. अ. ल. देशमुख, सैनिकी शाळेचे शिक्षक अर्जुन शिंदे, नरहरी पाटील, अभिषेक दुबे तसेच पुणे शहर भाजप ओबीसी मोर्चाचे सरचिटणीस विनोद मोहिते उपस्थित होते.
दत्तक घेण्यात येणाऱ्या मुलांची पुढील दोन वर्षात लागणारा शिक्षणाचा, निवास, भोजन, मनोरंजन, खेळ, व्यायाम अशा संपुर्ण खर्चाची जबाबदारी आम्ही घेणार आहोत. 12 वी नंतर डॉक्टर, इंजिनिअर बनू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या NEET, JEE Main, JEE Advance या परिक्षांचे मार्गदर्शन, यासोबतच सैन्यात अधिकारी बनन्याची स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना National Defence Academy (NDA) चे मोफत मार्गदर्शन मिळणार असल्याची माहिती विनोद मोहिते यांनी दिली.
नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा ही तिसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीची निवासी शाळा आहे. येथे शिक्षणाबरोबर हॉर्स रायडिंग, आर्चरी, फायरींग, ट्रेकिंग व फिटनेस साठी शास्त्रीय पद्धितीने व्यायामाचे प्रशिक्षण दिले जाते. यासोबत क्रिकेट, हॉकी, फुटबॉल, बास्केटबॉल आदी प्रकराच्या खेळांचे देखील प्रशिक्षण दिले जाते. यासाठी भव्य मैदान आणि अनुभवी प्रशिक्षक आहेत.
या संपुर्ण योजनेविषयी आणखी जाणून घेण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
डॉ. अ. ल. देशमुख – 9822608476
विनोद मोहिते – 8149970647
अर्जु शिंदे – 9860088263
नरहरी पाटील – 9421448785
