पुणे शहर

आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची शिवसेनेकडून तोडफोड

पुणे : शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची शिवसैनिकांनी तोडफोड केली आहे. बंडखोर आमदारांविरोधात पुण्यात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर तानाजी सावंत हेदेखील त्यांच्यासोबत बंड करून आसामला गेलेले आहेत. त्यानंतर आता शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी बालाजीनगर परिसरातील तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे.

Img 20220610 wa0330

शिंदे समर्थक आमदारांना धडा शिकवला जाईल असा इशारा काही शिवसेना नेत्यांनी यापूर्वी दिला होता. त्यानंतर शिवसैनिकांनी सावंत यांच्या कार्यालयात गोंदिया घातला आहे. सावंत हे सत्ता असताना शिवसेनेत आले त्यांनी सर्व पद उपभोगली आणि आता पक्षाशी गद्दारी केली, असा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. गद्दारांना धडा शिकवण्याची सुरूवात पुण्यात झाली आहे, आता संपूर्ण महाराष्ट्रात या प्रकारे आंदोलन केले जाईल असा इशारा संतप्त शिवसैनिकांनी दिला आहे.

 “ज्या आमदारांनी बंड केले आहे. ते शिवसेनेमुळे मोठे झाले आहे. त्या सर्वांनी हे विसरता कामा नये. जे आमदार तिकडे गेले आहेत त्या सर्वांनी पुन्हा यावे, अन्यथा आज तानाजी सावंत यांच्या ऑफिसची अवस्था झाली आहे. तशी राज्यातील अनेक बंडखोर आमदारांची होईल”, असा इशारा शिवसेनेचे माजी नगरसेवक विशाल धनवडे यांनी दिला आहे.

Img 20220621 wa00078738131563619319629

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये