पुणे शहर

शिवाजीनगर मतदार संघात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शाखांचे उद्घाटन

पुणे : राष्ट्रवादी  काँग्रेस पक्षाच्या २३ व्या वर्धापन दिनानिमीत्त छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातली प्रभाग क्र.१० मध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तीन शाखांचे उद्घाटन करण्यात आले.

या शाखांचे उद्घाटन  राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष किशोर कांबळे, ,कार्याध्यक्ष मनोज पाचपुते, महिला शहर अध्यक्षा मृणाली वाणी,  पुणे विभागीय विद्यार्थी अध्यक्षा संध्या सोनवणे यांच्या हस्ते पार पडले.

यावेळी मा.स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, उदय महाले, राजू साने, कार्तिक थोटे, केतन ओरसे, निलेश रुपटक्के,अबरार काजी व सर्व शहर पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संपुर्ण नियोजन मतदारसंघ अध्यक्ष ॲड स्वप्निल जोशी, प्रभाग अध्यक्ष रोहित बनकर, उपाध्यक्ष यश जगताप, अरबाज जमादार यांच्या सोबत सर्व युवक पदाधिकाऱ्यांनी केले.

यावेळी बोलताना किशोर कांबळे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांचे विचार तळागाळातील युवकांपर्यंत पोचले पाहिजेत तसेच या शाखांच्या माध्यमातून जनसामान्यांच्या आडीअडचणी सोडवण्यासाठी युवक कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत.

Img 20220521 wa0000

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये