पुणे शहर

२१ हजार दिव्यांमधून साकारले तेजोमय ‘जय श्रीराम’

पुणे : अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आपल्या संस्कृती प्रतिष्ठान आणि शिप्र मंडळींच्या वतीनं स.प. महाविद्यालय मैदानातील श्रीराम नगरीत भव्य दीपोत्सव साजरा कऱण्यात आला. आणि महाआरती करण्यात आली. या महाआरतीसह श्रीराम कथेचा समारोप झाला.

Fb img 1705981618016821325736852940434

हजारो पुणेकरांसमवेत तब्बल २१ हजार दिव्यांनी प्रभू श्रीरामाची तेजोमय प्रतिकृती या दिव्यांनी साकारली. हजारो दिव्यांनी आणि नयनरम्य आतषबाजीने श्रीराम नगरी परिसर उजळून निघाला. भाजप सरचिटणीस आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

Fb img 1705981610121366420935386653703

२१ हजारांहून अधिक लखलखत्या दिव्यांपासून सूर्याच्या व कमळाच्या आकृतीमध्ये तेजोमय ‘श्रीराम’ अशी रामाची प्रतिकृती साकारली होती. या अशा अभूतपूर्व उपक्रमाला महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दीप प्रज्वलीत केले. रामगीते, रामनामाचा जयघोष, रामाची आराधना आणि अखेरीस झालेली महाआरती यामुळे परिसर भक्तिमय झाला होता. 

‘जय श्री राम’, ‘सियावर रामचंद्र की जय’ ‘श्रीराम जय राम जय जय राम’ अशा उद्घोषांनी परिसर दुमदुमला होता. राम मंदिराच्या प्रतिकृतीवर झालेला लेझर शो आणि फटाक्यांच्या आतषबाजीने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. यावेळी झालेल्या गंगा घाट आरतीने भक्तिरसाची अनुभूती दिली.

Fb img 1705981600564616544230455696836

अयोध्येतील श्रीरामांची मूर्ती साकारताना स्थापित केलेल्या समितीमधील ज्येष्ठ मूर्तिकार डॉ. गो. बं. देगलूरकर, निवृत्त पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे यांच्या शुभहस्ते पहिला दिवा प्रज्वलित करण्यात आला. त्यानंतर हजारो महिलांनी दिवे प्रज्वलित केले.

Img 20230717 wa0012281298961742807603730839
Img 20231109 wa001228129905032016030159557
Img 20230511 wa0002282292969174931887579613

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये