महाराष्ट्र

भाजपच क्रमांक १ चा पक्ष- देवेंद्र फडणवीस

मुंबई – नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये सर्वाधिक जागा मिळवून भाजप हाच महाराष्ट्रातील क्रमांक १चा पक्ष आहे हे सिद्ध झाले आहे आणि यापुढेही भाजपच क्रमांक १चा पक्ष राहील, असा विश्वास भाजपचे नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारकडून धनशक्ती, दंडशक्ती, सत्तेचा कितीही गैरवापर झाला तरी मतदारांनी महाविकास आघाडीला नाकारुन भाजपला दणदणीत विजय मिळवून दिला आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

Img 20220118 wa00126707376222918832787

भाजपच्या २४ आणि सहयोगी मिळून सर्वाधिक ३०

नगरपालिकांमध्ये भाजपने सत्ता प्राप्त केली. सदस्य संख्येत सुद्धा सर्वाधिक ४१५हून अधिक जागा जिंकत भाजप क्रमांक १ चा पक्ष बनला आहे. जिल्हा परिषदा आणि नगरपालिका निवडणुकीत भाजपने मिळविलेल्या दणदणीत यशाचे शिल्पकार कठोर परिश्रमी कार्यकर्ते आहेत. मी त्यांचे अभिनंदन करतो. कितीही पक्ष एकत्र आले तरी देशातील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वावर विश्वास ठेवते हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. मोदीजींचे नेतृत्व आणि कार्यकर्त्यांचे परिश्रम यांचेच हे यश आहे, असे फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये