महाराष्ट्र
ओमायक्रॉनची रुग्णसंख्या वाढत असल्याने केंद्र सरकारचा महाराष्ट्रामध्ये पथक पाठवण्याचा निर्णय

मुंबई : ओमायक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव, करोनाची वाढती रुग्णसंख्या, लसीकरणाचा कमी वेग यामुळे महाराष्ट्रासह 10 राज्यांमध्ये पथक पाठवण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.
केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, मिझोरम, कर्नाटक, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड आणि पंजाब या राज्यांमध्येही पथक पाठविण्यात येणार आहे. ही पथकं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, आणि प्रतिबंधात्मक कारवायांवर लक्ष ठेवतील. रुग्णवाहिका, व्हेंटिलेटर आणि मेडिकल ऑक्सिजन यांची उपलब्धता कितपत आहे याचीही माहिती घेतली जाणार आहे.




