महाराष्ट्र

कोकण रेल्वेच्या सहा गाड्या काही काळासाठी रद्द

पुणे: दक्षिण रेल्वेने पलक्कड विभागातील पडिल – कुलशेकरा विभागादरम्यान दुहेरी मार्ग सुरू करण्यासाठी कामे हाती घेतली आहेत. त्याचा परिणाम कोकण रेल्वे मार्गावरुन धावणार्‍या काही गाड्यांवर होणार असून ४ ते ७ मार्चपर्यंतच्या सहा गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. सहा गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे.

कोकण रेल्वेची हद्द संपुष्टात आल्यानंतर दक्षिण रेल्वेचा मार्ग लागतो. कोकण रेल्वे मार्गावरुन धावणार्‍या अनेक गाड्या दक्षिण रेल्वे मार्गावरुन पुढे जातात. दक्षिण रेल्वे मार्गावर दुपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी काही गाड्यांच्या फेर्‍या रद्द केल्या आहेत. त्यामध्ये ४ मार्चची यशवंतपूर-कारवार एक्स्प्रेस, ५ मार्चची कारवार-यशवंतपूर एक्स्प्रेस, ५ मार्चची पुणे-एर्नाकुलम, ६ मार्चची मंगळुरू सेंट्रल-मडगाव आणि मडगाव-मंगळुरु एक्स्प्रेस, ७ मार्चची एर्नाकुलम-पुणे एक्स्प्रेसचा समावेश आहे.

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये