पुणे शहर

पुणे मेट्रोच्या वनाझ ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या विस्तारित मार्गाला केंद्र सरकारची मंजुरी- केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ

पुणे : पुणे मेट्रोच्या विस्तारित प्रकल्पाचे काम लवकरच सुरु होणार आहे.  वनाझ ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली/विठ्ठलवाडी या विस्तारित मार्गाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत पुणे मेट्रोच्या विस्तारित दुसऱ्या टप्प्याला मंजुरी देण्यात आली.

याबाबत बोलताना केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, पुणे मेट्रो प्रकल्पाच्या विस्तारित मार्गाला मंजुरी मिळावी यासाठी मी पाठपुरावा करत होतो. याला यश आले असून वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या दोन विस्तारित मार्गाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. खडकवासला ते खराडी या मार्गाच्या मंजुरी साठी देखील पाठपुरावा सुरू असून लवकरच या मार्गाला मंजुरी मिळेल अशी अपेक्षा आहे.

Img 20250508 wa0001235733770892078245

मोहोळ म्हणाले, पुणे शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागाला गतिमान करण्यासाठी हे निर्णायक पाऊल ठरणार आहे. या मंजुरीसाठी नुकतीच केंद्रीय नगरविकास मंत्री मा.श्री. मनोहरलाल खट्टर यांची भेट घेतली होती. हे दोन मार्ग सुमारे 12.75 किमी लांबीचे आहेत. यात एकूण 13 स्थानके असतील, चांदणी चौक, बावधन, कोथरूड, खराडी आणि वाघोली यासारख्या जलद-विकसनशील उपनगरांना जोडतील.

मंजुरी मिळालेल्या या १२.७५ किमी लांबीच्या मेट्रो मार्गावर १३ स्थानकं असतील, जी बावधन, कोथरूड, खराडी, वाघोलीसारख्या महत्त्वाच्या भागांना मेट्रोशी जोडतील. हा प्रकल्प IT हब्स, शैक्षणिक संस्था, निवासी व व्यावसायिक क्षेत्रांतील लाखो लोकांच्या दैनंदिन प्रवासाला सुरक्षित, जलद आणि पर्यावरणपूरक पर्याय देईल. एकंदरीतच पुण्याची वाहतूक व्यवस्था सशक्त करणारा हा ऐतिहासिक निर्णय आहे.

हे नवीन मार्ग जिल्हा न्यायालय इंटरचेंज स्थानकावरून Line-1 (निगडी–कात्रज) आणि Line-3 (हिंजवडी–जिल्हा न्यायालय) यांच्याशी जोडले जाणार आहे. तसेच, चांदणी चौक व वाघोली येथे आंतरशहर बससेवा मेट्रोशी जोडली जाणार आहे, जेणेकरून मुंबई, बेंगळुरू, छत्रपती संभाजीनगर अशा ठिकाणांहून येणाऱ्या प्रवाशांना थेट मेट्रोची जोड मिळेल. यामुळे पुण्यातील स्मार्ट आणि मल्टीमोडल ट्रान्सपोर्टचा पाया घातला जाणार आहे.

₹३,६२६.२४ कोटींचा हा प्रकल्प महा-मेट्रोमार्फत पुढील ४ वर्षांत पूर्ण करण्यात येणार आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात पुणे शहराच्या भविष्यासाठी, वाहतुकीच्या सुसंगत आणि शाश्वत विकासासाठी ही एक मोठी झेप आहे. असे मोहोळ म्हणाले.

Img 20240404 wa0013282293280934616164697357

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये