तुम्ही ईडी लावलीत तर मी सीडी लावीन ; एकनाथ खडसेंचा जळगांव पॅटर्न

मुंबई : जयंतराव मला बोलले तुम्ही राष्ट्रवादीत आले तर ईडी बिडी लावतील तर मी बोललो मी सीडी लावीन.अशा शब्दांत राष्ट्रवादीत प्रवेश करताना एकनाथ खडसे यांनी भाजप नेत्यांना मुळशी पॅटर्न या चित्रपटातील संवादा स्वरूपात इशारा दिला.
खडसे म्हणाले, समोरासमोर संघर्ष केला, पाठीत खंजीर खुपसला नाही. आयुष्यातील चाळीस वर्षे भाजपमध्ये काम केलं. स्वाभाविक आहे जिथे 40 वर्ष राहिलो एकाएकी पक्ष कसा सोडायचं असं वाटत होतं. माझी किती मानहानी झाली, छळवणूक झाली.
आज एकनाथ खडसे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. अनेक दिवसांपासून नाराज असलेल्या खडसेंनी भाजपला रामराम ठोकला असून शुक्रवारी ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं. अखेर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. एकनाथ खडसेंसोबत त्यांची कन्या रोहिणी खडसे यांनीही भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेश म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घटना आहे. एकनाथ खडसे यांच्या या निर्णयामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.



