पुणे शहर

चंद्रकांत मोकाटे यांचे कोथरूडमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन ; पदयात्रा काढत उमेदवारी अर्ज दाखल..

पुणे :  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत मोकाटे यांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत महाविकास आघाडीतील सर्व नेते,पदाधिकारी व कोथरूडकरांच्या समवेत पायी चालत जाऊन आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

छत्रपती श्री शिवाजी महाराज तसेच महर्षी कर्वे यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून पदयात्रेस सुरवात करण्यात आली. ठिकठिकाणी या पदयात्रेचे नागरिकांनी व पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त स्वागत केले. तत्पूर्वी छत्रपती श्री शिवाजी महाराज स्मारक चौक येथे महाविकास आघाडीतील सर्व घटकपक्षांच्या नेत्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत महाविकास आघाडीचे उमेदवार चंदकांत मोकाटे यांना बहुमताने निवडुन आणण्याचा संकल्प केला.

Img 20241020 wa0001435697684176070576

यावेळी बोलताना चंद्रकांत मोकाटे यांनी सर्व महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे आभार मानत त्यांच्यावर महाविकास आघाडीने टाकलेला विश्वास सार्थकी लावण्यासाठी कटीबध्द राहील असे आश्वासन सर्वांना दिले.

Img 20241029 wa00123093701579528819012

यावेळी शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन आहिर, माजी खासदार वंदना चव्हाण, अंकुश काकडे, अभय छाजेड, विकास पासलकर, लक्ष्मी दुधाणे, स्वाती पोकळे, चंदू कदम, प्रशांत बधे, दामोदर कुंबरे, शिवा मंत्री, योगेश मोकाटे, तानाजी निम्हण, शहरप्रमुख गजानन थरकुडे, संजय मोरे, डॉ.अभिजित मोरे, गोपाळ तिवारी, राजेश पळसकर, विजय खळदकर, स्वप्निल दुधाणे, किशोर कांबळे यांच्या समवेत मोठ्या संख्येने महिला व ज्येष्ठ नागरिक, कोथरूडकर तसेच सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Img 20240404 wa0016281297658999536660438617
Img 20240404 wa0012281298193617916566931378
Img 20240404 wa0013281298602993728148316202

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये