महाराष्ट्र

आपल्या हत्येचा कट रचला जातोय ; गायिका वैशाली भैसनेच्या फेसबुक पोस्टने खळबळ

मुंबई:-  हिंदी व मराठी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलेली गायिका तसेच ती मराठी बिग बॉस चा दुसऱ्या पर्वातील स्पर्धक म्हणून सहभागी होऊन घराघरात पोहचलेली वैशाली भैसने हिने आज Facebook वर पोस्ट टाकून तिच्या जीवाला धोका असल्याचे सांगितले आहे.” तिच्या या पोस्टमुळे एकच खळबळ उडाली आहे.

काही लोकांकडून माझ्या जीवाला धोका आहे. माझ्या हत्येचा कट रचला जातोय. दोन दिवसांनंतर पत्रकार परिषद घेऊन याचा गौप्यस्फोट मी करणार आहे. आज मला तुमच्या support ची गरज आहे.” अशी पोस्ट काही वेळापूर्वी वैशाली भैसने हिने Facebook page वर केली आहे.

तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी प्रतिक्रियांद्वारे तिला मदतीचे आश्वासन देखील दिले आहे. वैशाली भैसने कोणापासून धोका आहे? कशामुळे धोका आहे? असा अनेक प्रश्नांची व या घटनेची सविस्तर माहिती दोन दिवसांनी पत्रकार परिषदेत सांगणार असल्याचे तिने पोस्ट केले आहे. आता पत्रकार परिषदेत ती काय सांगणार हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये