महाराष्ट्र

पंकजा मुंडेंच्या समर्थकांकडून भाजप कार्यालय फोडण्याचा प्रयत्न

औरंगाबाद : विधानपरिषद निवडणुकीत पंकजा मुंडे यांना डावलण्यात आल्याने त्यांचे समर्थक नाराज झाले आहेत. याचे पडसाद औरंगाबादमध्ये उमटले आहेत. औरंगाबादमध्ये पंकजा मुंडेंच्या समर्थकांनी भाजपाचं कार्यालय फोडण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी वेळीच कारवाई करत या कार्यकर्त्यांना रोखलं. पोलिसांनी तीन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.

भाजपने पंकजा यांना डावलत महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे यांना उमेदवारी दिली आहे. तसंच विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह माजी मंत्री राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड या पाच जणांची उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र ऐनवेळी पंकजा मुंडे यांचं नाव वगळण्यात आल्याने समर्थक नाराज झाले असून आक्रमक झाले आहेत. त्यातूनच समर्थकांनी औरंगाबादमधील उस्मानपुरा येथील कार्यालय फोडण्याचा प्रयत्न केला. या समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

पंकजा मुंडेंवर सातत्याने अन्याय होत असल्याची भावना यावेळी समर्थकांनी घोषणा देताना व्यक्त केली. तसंच वारंवार डावलण्यात आल्याने नाराजीदेखील जाहीर केली. या घटनेनंतर भाजपा कार्यालयाबाहेर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये