आंतरराष्ट्रीय

आर्थिक संकटात असलेल्या श्रीलंकेत आणीबाणी..

गेल्या काही दिवसापासून आपण ऐकत आहोत की , श्रीलंकेची आर्थिक परिस्थिती खूप खराब झाली आहे. श्रीलंकेच्या आर्थिक संकटाच्या कथेतील सर्वात धक्कादायक आणि विचित्र घडामोड म्हणजे देशाच्या बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे २०२२ च्या वार्षिक शालेय परीक्षा पेपरच्या कमतरतेमुळे रद्द करण्यात आल्या. एकूणच मोठ्या आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेत आता आणीबाणी लागू झाली आहे.

महेश्वरी कामठे टीम सिंहासन News

सध्या श्रीलंका देशाला सर्वात वाईट आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. श्रीलंकेमध्ये असलेले महिंदा राजपक्षे सरकार हे दोन वर्षात परकीय चलनाच्या साठ्यात ७० टक्क्यांनी घसरल्याने अवमूल्यनाला कारणीभूत ठरल्यानंतर अत्यावश्यक आयातीसाठी पैसे देण्यासाठी संघर्ष करीत आहेत. इंधनाचा तुटवडा आहे, अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. सरकारने आंतरराष्ट्रीय नाणे निधीची चर्चा करण्याची तयारी केल्यामुळे यावर्षी $४ अब्ज डॉलर्सची विदेशी कर्ज फेडण्याची क्षमता नसल्याने चिंतेने विरोध सुरू झाला आहे.

रॉटरचा अंदाज आहे की श्रीलंकेकडे फक्त २.३१ अब्ज डॉलर्सचा साठा शिल्लक आहे. IMF ने नेहमी सूचित केले आहे की ते मदत करण्यास तयार आहेत. श्रीलंका सरकार एप्रिलमध्ये चर्चा करण्यात तयार आहे, परंतु जागतिक वित्तीय संस्थेने एक चेतावणी नोट केली आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात असे म्हटले आहे की, बेटा राष्ट्राला अनिश्चित कर्ज पातळीच्या जोखमीमुळे  ‘साॅलव्हेंसी’ समस्यांचा सामना करावा लागतो आहे.

श्रीलंकेला ऑगस्टमध्ये IMF कडून ७८७ दशलक्ष डॉलरची महामारी मदत मिळाली आहे. सूत्रांनी सांगितले की श्रीलंकेचे आर्थिक मंत्री बासिल राजपक्षे पुढील महिन्यात युनायटेड स्टेट्स मुख्यालय असलेल्या एजन्सीचा पाठिंबा मिळण्यासाठी जागतिक बँकांच्या अधिकाऱ्यांची देखील भेट घेणार आहेत. प्राथमिक कर्ज दरांमध्ये  चीन आणि आशिया विकास बँक यांचा समावेश होता. श्रीलंकेचे ३६.४ टक्के कर्ज  हे आंतरराष्ट्रीय सार्वभौम रोकांमध्ये आहे, या यादीत ADB (१४.६ टक्के), जपान (१०.९ टक्के) आणि चीन (१०.८ टक्के) यांचा क्रमांक लागतो.

श्रीलंकेचा अर्थव्यवस्थेचे काय झाले?

covid-19 जातीच्या आजारामुळे श्रीलंकेचा पर्यटन उद्योगांना खूप मोठा फटका बसला आहे. पर्यटन उद्योगांनी श्रीलंकेचे बरेचसे विदेशी चलन अणले आहे. परंतु covid-19 मुळे आलेल्या निर्बंधांमुळे पर्यटनात घट झाली. covid-19 साथीच्या आजाराचा परिणाम व्यतिरिक्त सरकारी वित्तपुरवठा आणि चुकीच्या वेळेत कर कपातीचा परिणाम म्हणून हे संकट मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे

Img 20220401 wa00069118907792321060635

या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी श्रीलंकेला भारताने केलेली मदत.

जानेवारी २०२२ मध्ये भारताने $४०० स्वॅप वाढवले आणि $५०० दशलक्ष एशियन क्लिअरिंग युनियन सेटलमेंट पुढे ढकलले. शिवाय भारताने पेट्रोलियम उत्पादनांच्या खरेदीसाठी $५०० दशलक्ष किमतीची नवीन मंजूर केली आहे. १७ मार्च दोन हजार बावीस रोजी श्रीलंकेतील अन्नपदार्थ आणि औषधे यांच्या सारख्या तातडीचा आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी भारताकडून लाईफ लाईन म्हणून US डॉलर $1 अब्ज डॉलरची क्रेडीट लाईन मिळाली. आर्थिक मंत्री बासी राजपक्षे यांच्या नवी दिल्ली भेटीदरम्यान भारत आणि श्रीलंका यांच्यात औपचारिकपणे क्रेडिट करार झाल्यानंतर क्रेडिट लाईन सक्रीय झाली.

आणीबाणीची परिस्थिती

श्रीलंकेत आणीबाणी लागू झाल्याने आता गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. 22 दशलक्ष लोकसंख्येच्या बेट राष्ट्रात वाढत्या आर्थिक संकटाला राजपक्षे यांनी चुकीच्या पद्धतीने हाताळल्याबद्दलचा संताप गुरुवारी उशिरा हिंसाचारात उफाळून आला. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी शुक्रवारी उशिरा देशव्यापी सार्वजनिक आणीबाणी जाहीर केली आणि दशकातील सर्वात वाईट आर्थिक संकटावर हिंसक निदर्शने सुरू झाली. श्रीलंकेत आता मोठ्या प्रमाणावर नागरिक रस्त्यावर उतरून निदर्शने करत आहेत.

Fb img 1648872694215
Img 20220402 wa0608
Img 20220331 194606 2033980067007703901957
Img 20220401 wa00227917081637990857028
Img 20220401 wa000868835748216030951
Img 20220401 191838 5877490473980342702457
Img 20220331 194602 2992942339412416554028
Img 20220331 194555 74885937282696690566
Img 20220331 194558 4714635920303569774190
Fb img 1648877169192
Img 20220401 wa0207
Img 20220401 wa00053953723036919566856
Img 20220402 wa0609
Img 20220402 092823 3147898442393631907355
Img 20220402 092838 8354604438478681415961
Img 20220402 wa0169

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये