कोथरुड

दीपक मानकर यांचा पाठपुरावा ; आठ दिवसात प्रभाग क्रमांक ११ साठी कॉम्पॅक्टर वाहन उपलब्ध..

प्रभागातील कचरा कार्यक्षमतेने उचलला जाणार

कोथरूड : रामबाग कॉलनी, शिवतीर्थनगर या प्रभाग क्रमांक ११ मधील कचरा वेळेत व कार्यक्षमतेने उचलण्यासाठी मोटर वाहन विभागाकडून मिळालेल्या कॉम्पॅक्टर वाहनाचे उद्घाटन माजी उपमहापौर, नगरसेवक दीपक मानकर यांच्या हस्ते करण्यात आले.

रामबाग कॉलनी-शिवतीर्थनगर या प्रभाग क्रमांक ११ मध्ये मोठ्या प्रमाणावर वस्तीभाग आहे. या ठिकाणी कार्यक्षमपणे कचरा गोळा करण्यासाठी व निर्मूलनासाठी कॉम्पॅक्टर वाहनाची गरज होती. या भागात ज्या गाड्या कचरा उचलण्याचे काम करत होत्या त्या जुन्या झाल्यामुळे त्यांचा सारखा मेन्टेन्स करावा लागत होता. त्यामुळे कचरा गोळा करण्याच्या कामात अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे प्रभागातील कचरा उचलण्यासाठी कॉम्पॅक्टर वाहन लवकरात लवकर देण्यात यावे अशी मागणी दीपक मानकर यांनी मोटर वाहन विभागाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर उगले यांच्याकडे केली होती.

मानकर यांनी या संदर्भात पाठपुरावा केल्यानंतर मोटर वाहन विभागाकडून आठ दिवसातच कॉम्पॅक्टर वाहन प्रभागातील कचरा उचलण्यासाठी देण्यात आले. या वाहनामुळे प्रभागातील कचरा तत्परतेने उचलला जाणार आहे. या वाहनाचे आज उद्घाटन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस कोथरूड मतदार संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन मानकर, सहाय्यक आयुक्त कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय केदार वझे, विभागीय आरोग्य निरीक्षक राम सोनवणे, ज्युनियर इंजिनियर नरेंद्र परदेशी, आरोग्य निरीक्षक संतोष पाटकर, नवनाथ मोकाशी, मुकादम सुरेश शिंदे, सुनील लोंढे व इतर सर्व स्टाफ तसेच कांताताई,  नवनाथ खिलारे, नवनाथ खिलारे, बाळासाहेब पिसाळ राजाभाऊ कुसाळकर, रोहिदास जोरी, दिलीप कानडे उपस्थित होते.

Fb img 1648963058213

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये