पुणे शहर

कामगार राज्य विमा महामंडळाच्या वतीने आयोजित भीम जयंती – 2023 कार्यक्रमाचे उदघाटन

पुणे : ईएसआयसी (कामगार राज्य विमा महामंडळ )एससी एसटी कर्मचारी व अधिकारी संघटना, पुणे च्या वतीने आयोजित भीम जयंती – 2023 या कार्यक्रमाचा उदघाट्न समारंभ 31 मार्च 2023 रोजी उप प्रादेशिक कार्यालय, बिबवेवाडी येथे उत्साहात पार पडला.कार्यक्रमाचे उदघाटन उप संचालक राजेश सिंह यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी उपसंचालक वित्त सी आर पाटील, सहायक संचालक सुनील देडे व इतर कर्मचारी – अधिकारी उपस्थित होते.भीम जयंती -2023 या उपक्रमाअंतर्गत व्हॉलीबॉल, क्रिकेट, टेबल टेनिस, बॅडमिंटन, निबंध स्पर्धा, क्वीझ कंपेटिशन,कॅरम स्पर्धा, बुद्धिबळ तसेच लहान मुलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्रसंगी बोलताना राजेश सिंह यांनी बाबासाहेबांनी राष्ट्रनिर्माणासाठी केलेले कार्य अतुलनीय असल्याचे सांगितले व उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.या स्पर्धा 31 मार्च पासून ते 9 एप्रिल पर्यंत चालतील.संघटनेने 14 एप्रिल ला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या दिवशी बक्षीस वितरण सोहळा व सामाजिक दायित्व म्हणून संघटनेतर्फे वंचित लोकांना काही मदत केली जाईल.कार्यक्रमाला ईएसआयसीचे कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Img 20221126 wa02126927299965323449855 1

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये