पुणे शहर

वेतन मिळत नसल्याने कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालयायातील कंत्राटी सफाई कामगारांवर उपासमारीची वेळ

कोथरूड : पुणे महानगरपालिका, कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाकडे सार्वजनिक स्वच्छता विभाग व कचरा वाहतूक विभागात काम करणाऱ्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना मागील तीन महिन्यापासून पगार मिळाला नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. नागरिकांचे आरोग्य निरोगी राहावे यासाठी स्वतः कचऱ्यात उतरून काम करणाऱ्यांवरच हे वेळ आल्याने प्रशासन व सरकार चालवणारी राजकीय मंडळी काय करत आहेत असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.

कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाकडे सार्वजनिक स्वच्छता विभाग व कचरा वाहतूक विभागात २२० कंत्राटी सफाई कामगार आपले आरोग्य धोक्यात घालून सफाईचे कामे करत आहेत. जानेवारी – २०२२  पासून सफाईच्या निविदा मान्य करून घेण्याची प्रक्रियाच पूर्ण होत नसल्याने प्रशासकीय यंत्रणेच्या भोंगळ कारभारामुळे कंत्राटी सफाई कामगारांवार  उपासमारीची वेळ आली आहे.

कोणत्याच नेत्याला किवा कोणत्याच सरकारला कंत्राटी सफाई कामगारांच्या प्रश्नाविषयी कणव नसल्याचे सफाई कर्मचारी सांगत आहेत.  “आम्ही घाणीत काम करतोय आमच्या जीवाची बाजी लावतोय, तीळ तीळ रोज मरतोय, आमची पोरं बाळं अन्नाविना मरत आहेत, आम्हाला माणूस म्हणून किमान दोन वेळेच्या जेवणापुरते तरी किमान वेतन आमच्या पदरी द्या, अशी आर्त हाक हे कर्मचारी देत आहेत.

कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्याल्याकडे २२० सफाई कंत्राटी कामगारांचे माहे मे, जुन – २०२२ व जुलै महिना संपत आला तरी वेतन अदा करण्याचा पत्ताच नाही.  गेली सहा सात महिने झाले तरी प्रशासकीय यंत्रणेला निविदाच मान्य होत नाही. पुणे महानगरपालिका कामगार युनियनच्या माध्यमातून थकीत वेतन अदा करणे विषयी पत्र व्यवहार देखील केला आहे. शिवाय प्रत्यक्षात भेट घेऊन वेतनाविषयी विचारणा केली असता तांत्रिक आडचणी निर्माण झाल्या आहेत, आडचणी दूर झाल्या की पगार होईल किंवा तुम्हाला काम करायचं असेल तर काम करा नाही तर कामाला येऊ नका असे अधिकारी उतरं देतात मग सांगा आम्ही जगायचं कस असा सवाल कंत्राटी कामगार करत आहेत.

युनियनचे अध्यक्ष कॉ. उदय भट व जनरल सेक्रेटरी कॉ. मुक्ता मनोहर यांनी प्रशासक महापालिका आयुक्त यांना कंत्राटी कामगांराच्या सर्व प्रश्नाच्या संदर्भात लेखी पत्रव्यवहार व बैठका देखील घेतल्या आहेत. पण फक्त आश्वासना शिवाय काहीच मिळत नाही.

Img 20220708 wa00011330202002021897215

१) किमान वेतन कायद्याप्रमाणे अदा करण्यात यावे तसेच किमान वेतनाची थकबाकी द्यावी. २) दरमहा दहा तारखेच्या आत सर्व कंत्राटी कामगारांची वेतन अदा करावे. ३)वेतन चिठ्ठी देण्यात यावी तसेच व ई एस आय चा योग्य नियमित भरणा करावा व पीएफ आणि ईएसआय कार्ड देण्याची पूर्तता करावी. ४) बहुउद्देशीय कामगार अशा नावाखाली नेमणूक करण्यात आलेल्या सुरक्षारक्षकांना सुरक्षारक्षक कायद्यानुसार पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात नोंदणी करून काम द्या. ५) सर्व कंत्राटी कामगारांना कायम करा व समान कामाला समान वेतन द्या. या कंत्राटी सफाई कामगाराच्या सर्व प्रश्नाविषयीच्या अनेक तक्रारी लेखी स्वरूपात युनियनकडे आल्या आहेत.

गणेश मूर्तींचे पुण्यात आगमन ; जाणून घ्या शाडू माती आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिस गणेश मूर्तींमधील फरक

प्रशासकीय यंत्रणेने गांभीर्याने कंत्राटी कामगाराचे प्रश्नाची सोडवणूक करून न्याय दिला नाही तर आम्हाला संप करण्याशिवाय पर्याय नाही.” तसेच शुक्रवार  दि. ५ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ११ वाजता महानगरपालिकेच्या मुख्य दरवाज्यासमोर होणाऱ्या निदर्शनामध्ये सर्व खात्यातील कंत्राटी कामगांरानी सहभागी व्हावे असे आवाहन युनियनच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये