कर्तव्य बजावत असताना कंत्राटी कामगार भाजून गंभीर जखमी ; वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील घटना

कंत्राटी कामगारांचा वाली कोण ? पुणे : वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय पुणे महानगरपालिकेकडे घनकचरा व्यवस्थापन विभागात प्रभाग क्रमांक १३ हॅपी कॉलनी हजेरी कोटी पंडित जितेंद्र अभिषेकी उद्याना शेजारी गणपती विसर्जन हौदावर काम करत असताना विद्युत वाहिनी शी संपर्क आल्याने महापालिकेचा कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे.
पुणे : वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय पुणे महानगरपालिकेकडे घनकचरा व्यवस्थापन विभागात प्रभाग क्रमांक १३ हॅपी कॉलनी हजेरी कोटी पंडित जितेंद्र अभिषेकी उद्याना शेजारी गणपती विसर्जन हौदावर काम करत असताना विद्युत वाहिनी शी संपर्क आल्याने महापालिकेचा कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. सुरज रमेश खुडे असे या जखमी झालेल्या कंत्राटी कामगाराचे नाव आहे. खुडे हातातील वायर फेकत असताना वरील हाय टेन्शन तारेला सदर वायर स्पर्श झाल्याने ते ३०% भाजून गंभीररित्या जखमी झाला आहे. सदर जखमी झालेला कंत्राटी कामगारांस सुरुवातीला भारतीय हॉस्पिटलमध्ये केले होते. तेथून त्यांना ससून रुग्णालय या ठिकाणी ॲडमिट करण्यात आले.
सुरज रमेश खुडे असे या जखमी झालेल्या कंत्राटी कामगाराचे नाव आहे. खुडे हातातील वायर फेकत असताना वरील हाय टेन्शन तारेला सदर वायर स्पर्श झाल्याने ते ३०% भाजून गंभीररित्या जखमी झाला आहे. सदर जखमी झालेला कंत्राटी कामगारांस सुरुवातीला भारतीय हॉस्पिटलमध्ये केले होते. तेथून त्यांना ससून रुग्णालय या ठिकाणी ॲडमिट करण्यात आले. अशा कंत्राटी कामगारांना अचानक अपघात होऊन गंभीर रित्या जखमी झाल्यास कोणताही संबंधीत कंत्राटदार जबाबदारी घेत नाहीत असा आरोप आता कामगारांकडून करण्यात येत आहे. जखमी कामगारांना उपचार करण्याची जबाबदारी संबधीत कंत्राटदार किंवा महानगरपालिकेचे प्रशासन देखील करत नाही अशी खंत कामगार युनियन कडून व्यक्त केली जात आहे.
अशा कंत्राटी कामगारांना अचानक अपघात होऊन गंभीर रित्या जखमी झाल्यास कोणताही संबंधीत कंत्राटदार जबाबदारी घेत नाहीत असा आरोप आता कामगारांकडून करण्यात येत आहे. जखमी कामगारांना उपचार करण्याची जबाबदारी संबधीत कंत्राटदार किंवा महानगरपालिकेचे प्रशासन देखील करत नाही अशी खंत कामगार युनियन कडून व्यक्त केली जात आहे.

पुणे महानगरपालिका कामगार युनियन मान्यताप्राप्तच्या वतीने कंत्राटी कामगारांना इएसआयसी चे पहचान कार्ड त्वरित देण्याची मागणी वारंवार करून देखील संपूर्ण कंत्राटी कामगारांना अद्याप पर्यंत ते कार्ड दिले गेले नाही. ५०% कंत्राटी कामगारांना आत्तापर्यंत युनियनच्या संघटनात्मक ताकदीवर ई- पहचान कार्ड स्वतः महानगरपालिकेच्या प्रशासनाने लक्ष घालून संबंधित ठेकेदारांनी प्रत्येक कंत्राटी कामगारांना ई- पहचान कार्ड देण्याची मागणी केली आहे. तरी अद्याप पर्यंत संपूर्ण कंत्राटी कामगारांना ई-पहचान कार्ड दिले गेले नाही.



शिवाय अचानक अपघात झालेल्या कंत्राटी कामगारांना महानगरपालिकेने मोफत उपचार करण्याची जबाबदारी घ्यावी याचे निवेदन महापालिका आयुक्तांना लेखी स्वरूपात दिलेली आहे तरी संबंधित मागणीला महानगरपालिकेच्या प्रशासनाने अद्याप पर्यंत मान्यता दिलेली नाही. कोणत्याही क्षेत्रीय कार्यालयात कर्तव्य बजावत असताना अचानक अपघात झालेल्या कंत्राटी कामगारांना उपचार मिळवण्यासाठी युनियनच्या माध्यमातून एक सुरक्षा पथक तयार करण्यात आले आहे, या सुरक्षा पथकात कॉ. राम अडागळे, कॉ. करुणा गजधनी, कॉ. सुर्यकांत गवळी, कॉ. शरद भाकरे, कॉ. समिर शितकल, जीवन मुलकूल इत्यादी कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात आला आहे.
सदर पथकाच्या माध्यमातून जखमी झालेल्या कंत्राटी कामगांराना त्वरित ई- पहचान कार्ड मिळवून देणे त्यांना दवाखान्यात त्वरित अडमिट करून उपचार करण्यास भाग पाडले जाते. अशा घटना युनियनच्या कार्यकर्त्यांना माहिती मिळाली की त्वरित संपर्क साधतात. शॉक लागून गंभीर जखमी झालेल्या कामगांरास मोठ्या दवाखान्यात मोफत उपचार करण्याची संबंधीत कंत्राटदारानी व महानगरपालिकेच्या प्रशासनाने घ्यावी तसेच संबधीत सेवकाच्या कुंटूबास सेवक बरा होईपर्यंत वेतन अदा करण्याची मागणी देखील पुणे महानगरपालिका कामगार युनियनच्या वतीने करण्यात आली आहे अशी माहीती कार्यालयीन चिटणीस कॉ. वैजीनाथ गायकवाड यांनी दिली आहे.






