धनंजय मुंडे यांचा अखेर राजीनामा.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिला राजीनामा

मुंबई : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येनंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर 82 दिवसानंतर मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मुंडे यांचे पीए राजीनाम्याची कॉपी घेऊन सागर बंगल्यावर पोहचले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला आहे, अशी घोषणा प्रसार माध्यमांसमोर दिली. आपण हा राजीनामा स्वीकारला असून तो पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवल्याचे, मुंडे यांना पदमुक्त केल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
9 डिसेंबर 2024 रोजी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. त्यात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिकी कराड पुढे आले होते तेव्हापासून मुंडे नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी लावून धरली होती. काल समाज माध्यमांवर सीआयडीच्या दोषारोपपत्रा सोबतचे क्रूर हत्येचे फोटो समोर आल्यानंतर राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
आज सकाळपासूनच धनंजय मुंडे यांच्या राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरू होती. आज सकाळपासून विरोधकांनी राजीनाम्याची मागणी लावून धरली होती.



