राष्ट्रीय
सचिन सावंत यांचा अमित शहांना उपरोधिक टोला
काँग्रेसने ७० वर्षात काय केलं असं म्हणतच शहा एम्समध्ये दाखल
सचिन सावंत यांचा उपरोधिक टोला

केंद्रीय गृहमंत्री व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची तब्येत बिघडल्याने त्यांना पुन्हा नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोना ची लागण झाली होती परंतु त्यातून ते बरे झाले होते, मात्र त्यांना पुन्हा त्रास जाणवू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शहा रुग्णालयात दाखल झाल्यानंतर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी त्यांना उपरोधिक टोला लगावत लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू यांना दोष देत १९५६ मध्ये बाळ नरेंद्र यांनी दिल्लीत स्थापन केलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (एम्स) मध्ये काँग्रेसने सत्तर वर्षात काय केलं असा प्रश्न विचारतच शाह उपचारासाठी दाखल झाले असून ते लवकर बरे व्हावेत अशा आम्ही त्यांना सदिच्छा देतो असे ट्विट सावंत यांनी करत निशाणा साधला आहे.




