कोथरुड
सुतारदरा व रामबाग कॉलनीमधील सफाई कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त भेट वस्तूंचे वाटप..

कोथरुड : सुतारदरा व रामबाग कॉलनी मधील महापालिकेच्या आरोग्य कोठीतील सफाई कर्मचाऱ्यांना दिपाली संतोष डोख यांच्या वतीने दिवाळी मिठाई व भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले.
यावेळी पुणे शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा मृणालीणी वाणी, संतोष मोहोळ, आरोग्य निरक्षक ताटकर, मुकादम भोसले, आशा जमदाडे, संगिता मोहोळ, उर्मिला गायकवाड, सारिका जोरी, सारिका चोरघडे, मीना ठुले, उषा मरे, विजय ठोंबरे आदी उपस्थित होते.




